ट्रक आणि पिकअपचा भीषण अपघात

अहमदनगर शाहरतील पुणे मनमाड बायपास रोडवर आयशर टेम्पो,ट्रक आणि पिकअपचा भीषण अपघात होऊन पिकअपमधील तिघांचा मृत्यू झालाय. ही घटना मंगळवारी रात्रिच्या सुमारास घटना घडली. या अपघातात सुमारे आठ ते १० ते १२ जण जखमी झाले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली असून त्यांच्यावर नगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाबासाहेब नामदेव जठार , महेश बाबासाहेब […]

ट्रक आणि पिकअपचा भीषण अपघात

अहमदनगर शाहरतील पुणे मनमाड बायपास रोडवर आयशर टेम्पो,ट्रक आणि पिकअपचा भीषण अपघात होऊन पिकअपमधील तिघांचा मृत्यू झालाय. ही घटना मंगळवारी रात्रिच्या सुमारास घटना घडली. या अपघातात सुमारे आठ ते १० ते १२ जण जखमी झाले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली असून त्यांच्यावर नगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाबासाहेब नामदेव जठार , महेश बाबासाहेब खैरनाथ हे दोघे येवला तालुक्यातील असून आणि आणखी एक यांचा मृत्यू झाला आहे.

सध्या निंबळक बायपास रोडचे काम सुरू असल्याने एका बाजूनेच वाहतूक सुरू असून दुसरी बाजू वाहतूकीसाठी बंद करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री या रोडवरून जाणाऱ्या पिकअपला आयशर टेम्पो व ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाला.

पिकअपमधील व्यक्ती देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला असावा अशी माहिती पोलिसांकडून समजली. दरम्यान याप्रकरणी पोलीस अंमलदार बाबासाहेब काळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आयशर टेम्पो व ट्रकवरील अज्ञात चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number