SIR Draft Voter List: महाराष्ट्र अन् दिल्लीत SIR ची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; अडीच कोटी नागरिकांची नावे गायब, ‘या’ तारखेपर्यंत करा दुरुस्ती

घरोघरी जाऊन करण्यात आलेली पाहणी, डिजिटायझेशनसाठी आवश्यक फॉर्म न मिळणे आणि विविध तांत्रिक त्रुटींमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.

SIR Draft Voter List: महाराष्ट्र अन् दिल्लीत SIR ची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; अडीच कोटी नागरिकांची नावे गायब, ‘या’ तारखेपर्यंत करा दुरुस्ती

SIR Draft Voter List:  विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) उपक्रमांतर्गत महाराष्ट्र आणि दिल्लीसाठी प्रारूप (ड्राफ्ट) मतदार यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये कोट्यवधी मतदारांची नावे समाविष्ट झालेली नाहीत. घरोघरी जाऊन करण्यात आलेली पाहणी, डिजिटायझेशनसाठी आवश्यक फॉर्म न मिळणे आणि विविध तांत्रिक त्रुटींमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. या मोहिमेत प्रामुख्याने मृत व्यक्ती, कायमचे स्थलांतरित झालेले नागरिक, दुबार नोंदणी असणारे आणि गैरहजर मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. दिल्लीतील 1 कोटी 45 लाख नोंदणीकृत मतदारांपैकी सुमारे 47 लाख 56 हजार नावे यादीत आलेली नाहीत, तर महाराष्ट्रात तब्बल 2 कोटी 7 लाख मतदारांचा रेकॉर्ड डिजिटाईज न झाल्याने त्यांची नावे या प्रारूपातून बाहेर राहिली आहेत.

30 सप्टेंबरपर्यंत दावे अन् हरकती नोंदवण्याची संधी; 4 नोव्हेंबरला अंतिम यादी

ज्या नागरिकांची नावे या प्रारूप यादीत नाहीत, त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. निवडणूक आयोगाने अशा मतदारांना आपले नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी 1 महिन्याचा अवधी दिला आहे. 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत नागरिक आपले दावे किंवा हरकती नोंदवू शकतात. प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची छाननी करून 29 ऑक्टोबर 2026 पर्यंत निर्णय घेतला जाईल. त्यानंतर 4 नोव्हेंबर 2026 रोजी दोन्ही राज्यांची अंतिम आणि अधिकृत मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

हेही वाचा – PM Modi and Amit Thackeray: "महाराजांपेक्षा पंतप्रधान मोठे झालेत?" छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला मोदींचा फोटो; अमित ठाकरे आक्रमक

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर नाव तपासा; 'असा' करा ऑनलाईन अर्ज

मतदारांनी आपले नाव यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी महाराष्ट्र आणि दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या (CEO) अधिकृत संकेतस्थळाला किंवा निवडणूक आयोगाच्या portal (voters.eci.gov.in) ला भेट द्यावी. यादीत नाव नसल्यास नागरिकांनी त्वरित 'फॉर्म 6' भरून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा. जर एखाद्या अपात्र व्यक्तीचे नाव समाविष्ट झाले असल्यास त्यावर हरकत घेण्यासाठी 'फॉर्म 7' वापरता येईल. तसेच नावातील स्पेलिंग, पत्ता किंवा इतर दुरुस्तीसाठी 'फॉर्म 8' भरून बदल करून घेता येईल. अंतिम यादी जाहीर होण्यापूर्वी मतदारांनी आपल्या हक्काची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number