Sharad Pawar : ‘माझा फोटो लावून मते मागू नका…’; बारामती पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरून शरद पवार कडाडले

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) मेळाव्यातील बँनरवर आपला फोटो वापरला गेल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Sharad Pawar : ‘माझा फोटो लावून मते मागू नका…’; बारामती पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरून शरद पवार कडाडले

Sharad Pawar Photo Controversy:  बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) मेळाव्यातील बँनरवर आपला फोटो वापरला गेल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “माझा फोटो लावून मते मागणे चुकीचे आहे,” अशा स्पष्ट शब्दांत पवारांनी आपला विरोध दर्शवला आहे.  

‘माझा फोटो वापरणे चुकीचेच’
दिल्लीत माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी बारामतीतील मेळाव्याच्या बॅनरवर आपला फोटो लावल्याच्या प्रकारावर कडक शब्दांत भाष्य केले. पत्रकारांनी जेव्हा त्यांना विचारले की, “तिथल्या एका बॅनरवर तुमचाही फोटो आहे, यावर तुमचे काय म्हणणे आहे?” तेव्हा पवार म्हणाले, “जर माझा फोटो त्यांच्या बॅनरवर असेल, तर हे पूर्णपणे चुकीचे आहे. माझा फोटो लावून मते मागू नका, असे मी आधीच सुचवले आहे.” आपल्या प्रतिमेचा वापर करून राजकीय फायदा घेणाऱ्यांना त्यांनी या निमित्ताने सुनावले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा बिनविरोध व्हावी, अशी इच्छा शरद पवार यांनी देखील व्यक्त केली आहे. तसेच शरद पवारांनी पवार कुटुंबाचा कुटुंब प्रमुख म्हणून ही निवडणूक बिनविरोधात करण्यासाठी प्रयत्न केला आहे. परंतु, आपण सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचार करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.    

हेही वाचा – Shashikant Shinde: राहुरीच्या रणांगणातून तनपुरेंची माघार; शरद पवार गटाचा नवा प्लॅन; शशिकांत शिंदेंकडून अनेक मोठे खुलासे

लोकशाही अधिकाराचा सन्मान
पवारांनी यावेळी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, निवडणूक लढवणे हा प्रत्येकाचा अधिकार असला तरी, नैतिकतेच्या आधारावर काही गोष्टी पाळणे गरजेचे आहे. आपला फोटो वापरून मतदारांची दिशाभूल करू नये, असा संदेश त्यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number