CM Devendra Fadnavis : जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘ती एक मागणीदेखील…’

जरांगेंनी उपोषण मागे घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला असून सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल जरांगेंचे आभार मानले आहेत.

CM Devendra Fadnavis : जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘ती एक मागणीदेखील…’

Devendra Fadnavis on Manoj Jarange Ends Fasting: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण अखेर 20 व्या दिवशी मागे घेण्यात आले आहे. या घडामोडीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला असून सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल जरांगेंचे आभार मानले आहेत. सरकारने जरांगे यांच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य केल्या असून एका मागणीबाबत कायदेशीर अडचण असल्याचे त्यांना स्पष्ट केले आहे. उपोषण संपवण्यासाठी सहकार्य करणारे मंत्री विखे पाटील, प्रसाद लाड आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांनी विशेष आभार मानले. कोणत्याही सणात विघ्न न येता हे आंदोलन शांततेत संपल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

उपसमितीच्या आश्वासनांची पूर्तता करणार; मराठा समाजासाठी सरकार सकारात्मक
उपोषण मागे घेतल्यानंतर प्रशासकीय स्तरावर पुढील कार्यवाही वेगाने केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. उपसमितीने आंदोलकांना दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यासाठी तातडीने बैठका घेतल्या जातील आणि आवश्यक ते प्रशासकीय निर्णय घेतले जातील. मराठा समाजाच्या कल्याणासाठी जेवढे ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतले, तितके यापूर्वी कोणीही केले नाहीत, असा दावा फडणवीसांनी केला. मराठा समाजाला जे काही मिळाले ते आमच्याच कार्यकाळात मिळाले असून, सरकारचे दरवाजे चर्चा आणि संवादासाठी कायम उघडे आहेत, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

हेही वाचा – Manoj Jarange Patil : महत्त्वाची बातमी! जरांगेंचं सरकारला अल्टिमेटम, 3 महिन्यांची मुदतवाढ; अन्यथा उपोषण नाही, थेट मुंबई काठणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘सेवा सप्ताह’ अभियानाला सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रात महिनाभर विविध सामाजिक उपक्रमांचे आणि सेवा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी कधीही स्वतःचा वाढदिवस साजरा करत नाहीत, त्यामुळे या औचित्यावर जनतेची सेवा करण्याचे ठरवले आहे. ‘सेवा सप्ताहाच्या’ माध्यमातून नागरिकांपर्यंत आवश्यक त्या सोयी-सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित भारताचे’ स्वप्न नक्की पूर्ण होईल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

यूपीआय (UPI) शुल्काच्या वादावरून राहुल गांधींवर मुख्यमंत्र्यांची कडक टीका
यूपीआय पेमेंटवरील संभाव्य शुल्कावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी अत्यंत कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले. राहुल गांधींना स्वतःचा पाठीचा कणा आहे का, असा सवाल करत ते सकाळी एक, दुपारी एक आणि संध्याकाळी वेगळेच बोलतात, अशी खोचक टीका त्यांनी केली. यूपीआयबाबत केंद्र सरकारने आधीच अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. भारताने बनवलेले हे पेमेंट गेटवे आज संपूर्ण जग वापरत असून, डिजिटल व्यवहारांमुळे थेट खात्यात सबसिडी जमा होऊन देशातील भ्रष्टाचार संपला आहे, असे ठाम प्रतिपादन फडणवीसांनी केले.

हेही वाचा – Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या प्रशासकीय प्रक्रियेला वेग; शिंदे समिती व आरक्षण कक्षाला नवीन प्रशासकीय भवनात जागा मंजूर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number