Devendra Fadanvis : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी…’, उपमुख्यमंत्री पदाच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्ट मत

या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadanvis : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी…’, उपमुख्यमंत्री पदाच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्ट मत

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनाने राजकिय वर्तुळात एक पोकळी निर्माण झाली आहे. अशातच  सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवड केली जाणार आहे. याशिवाय त्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, अशी माहिती देखील समोर आली आहे.  या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेसच घेईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले की, कोणताही निर्णय घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही सरकार म्हणून भाजप पक्ष म्हणून उभे राहणार आहोत. अजित दादाचं कुटुंब असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आम्ही त्याच्या पाठीशी असून पूर्णपणे उभे आहोत, त्यांच्या निर्णयाला आमचं समर्थन असेल. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number