Sunetra Pawar On Supriya Sule : "दादांच्या जाण्याच दुःख मुलं आणि माझ्यापेक्षा कुणाला जास्त माहिती" सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर सुनेत्रा पवारांच थेट उत्तर

अजितदादा यांच्या विमान अपघात निधनाबद्दल सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थेट उत्तर दिले आहे.

Sunetra Pawar On Supriya Sule : &quotदादांच्या जाण्याच दुःख मुलं आणि माझ्यापेक्षा कुणाला जास्त माहिती&quot सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर सुनेत्रा पवारांच थेट उत्तर

राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सु्प्रिया सुळे यांनी अजितदादा यांच्या विमान अपघात निधनाबद्दल नुकतचं एक वक्तव्य केलं. अमित ठाकरेंनी फोटो हटवल्यानं तुम्ही एफआयआर केला, माझा भाऊ गमावला, सरकारमध्ये माझा भाऊ त्यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते, त्यांचा एवढा मोठा अपघात होता, त्यांचा मृत्यू झाला, त्याचा आजपर्यंत एफआयआर झाला का? सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळे यांना थेट उत्तर दिले आहे. यावेळी दादांच्या आई, मुलं आणि माझ्या एवढं मोठं दुःख कुणाचंच असू शकत नाही, असं म्हणत सुनेत्रा पवार यांनी भूमिका मांडली. 

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, "अजित दादांच्या जाण्याच दुःख किती आहे हे माझी मुले आणि माझ्यापेक्षा कुणाला जास्त माहिती असणार. अजित दादांच्या अपघाताच राजकारण करू नका. आमचा तपास यंत्रणांवर विश्वास आहे. त्यांना ही आपण वेळ दिला पाहिजे यात. दादांची आई… दादांची मुलं आणि मी याच्यापेक्षा जास्त दुःख कुणाला कळणार? पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी ही सभागृहात सांगितले आहे, त्यांना ही आम्ही भेटलो आहे…"

हेही वाचा- Vidyanand Bapat, Santosh Chavan : 'कट रचने, 5-6 गुन्हे दाखल, स्वतःच्याच वहिलांसोबत गंभीर कृत्य' बापटांवर हल्ला करणारा आरोपी सराईत गुन्हेगार?

"सगळ्यांनाच वाटत आहे की काही तरी निर्णय आम्हाला पाहिजे आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करत शकतो. दादांच्या जाण्याच राजकारण कुणीच करू नये असे मला वाटते. यामध्ये वारंवार मीडिया ट्रायल होत आहे का असे मला वाटते. सतत मीडियामध्ये म्हणजेच अपडेट मिळणे असे नाही. लवकरात लवकर चौकशी व्हावी असे आम्हाला ही वाटते आम्ही तसे प्रयत्न करतो आहे."

सुप्रिया सुळे काय म्हणालेल्या? 
माझ्या भावाच्या विमानाचा एवढा मोठा अपघात झाला. सत्तेत असणाऱ्या, उपमुख्यमंत्री असणाऱ्या भावाचा अपघात झाला. याबाबत अद्याप सरकारने कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. राष्ट्रवादीचा अजित पवार गट सत्तेत आहे, अजित पवार गटाच्या 40 आमदारांनी, 9 मंत्र्यांनी कधीतरी एफआयआर किंवा चौकशीवर एक शब्दही काढलेला नाही अशी खंत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number