Rupali Chakankar : रूपाली चाकणकरांची बदनामी पडली महागात; पुणे पोलिसांकडून सुषमा अंधारेंसह 17 जणांवर गुन्हे दाखल

भोंदू अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य करत सोशल मीडियावर अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करण्यात आल्या होत्या.

Rupali Chakankar : रूपाली चाकणकरांची बदनामी पडली महागात; पुणे पोलिसांकडून सुषमा अंधारेंसह 17 जणांवर गुन्हे दाखल

Rupali Chakankar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची सोशल मीडियावर अश्लील आणि बदनामीकारक मजकूर पसरवून प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी अत्यंत कठोर कारवाई केली आहे. या प्रकरणी विविध राजकीय पक्षांतील प्रमुख महिला नेत्यांसह एकूण 17 जणांविरोधात गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय बिनबुडाचे आरोप करून कौटुंबिक व सामाजिक प्रतिष्ठा दुखावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

अशोक खरात प्रकरणावरून सोशल मीडियावर बदनामीचे षडयंत्र

भोंदू अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य करत सोशल मीडियावर अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करण्यात आल्या होत्या. चाकणकर कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी एसआयटी (SIT), ईडी (ED) आणि पोलिसांनी केलेल्या चौकशीला त्यांनी पूर्ण सहकार्य केले असून त्यात कोणतीही बेकायदेशीर बाब समोर आलेली नव्हती. तरीही केवळ राजकीय द्वेषापोटी आणि बदनामी करण्याच्या उद्देशाने हे षडयंत्र रचून सोशल मीडियावर बनावट मजकूर व्हायरल करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

हेही वाचा – CJP Delhi Protest: CJP चा दिल्लीत पुन्हा एल्गार! तारीख अन् मार्ग जाहीर करत केली महामोर्चाची घोषणा

गुन्हा दाखल झालेल्या प्रमुख नेत्या आणि संशयित

सायबर पोलिसांनी दाखल केलेल्या FIR मध्ये राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक बड्या चेहऱ्यांचा समावेश आहे. शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे, डॉ. आशा मिरगे, राष्ट्रवादी (अजित पवार गट) नेत्या रूपाली पाटील ठोंबरे, काँग्रेस नेत्या संगीता तिवारी आणि दीपाली सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय अश्विनी खाडे, महादेव बालगुडे, हनुमंत गलगटे, वर्षा कांबळे, राजश्री समदर, गणेश लोखंडे, हेमा पिंगळे, रंजना देशमुख, योगेश सावंत, मोहसीन शेख आणि इतर दोन अशा एकूण 17 जणांचा यामध्ये समावेश आहे.

पोलीस आणि कायदेशीर कारवाईचा बडगा

आपली बदनामी करणाऱ्यांविरोधात रूपाली चाकणकर यांनी आक्रमक कायदेशीर पवित्रा घेतला आहे. पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून, संशयित सोशल मीडिया अकाउंट्स आणि हे डिजिटल रॅकेट चालवणाऱ्या इतर व्यक्तींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number