मंत्रालयासमोर काँग्रेसचं भाजपाविरोधात आंदोलन

काँग्रेस पक्षाकडून मंत्रालयासमोरील रस्त्यावर आंदोलन करण्यात येत आहे.

मंत्रालयासमोर काँग्रेसचं भाजपाविरोधात आंदोलन

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांनी आंदोलने करण्यात येत आहेत. सर्व ठिकाणी त्यांच्याकडून आंदोलने होताना दिसत आहेत. अशातच आता काँग्रेस पक्षाकडून मंत्रालयासमोरील रस्त्यावर आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत असल्याचे दिसत आहे. यावेळी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्या अशा घोषणा देखील देण्यात आल्या आहेत.

 

हेही वाचा : मुंबईत काँग्रेस कार्यालयावर हल्ला

 

काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मंत्रालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. बाबासाहेबांचा फोटो हातात घेऊन आंदोलन करण्यात आले आहे. त्यांनतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. त्या ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली. या गर्दीला नियंत्रण करण्यासाठी त्या ठिकाणी पोलिस होते.

 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

काँग्रेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वक्तव्य केल्याने गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करत आहे. या पार्श्वभूमीवर गुरूवारी भाजपाच्या युवा मोर्चाकडून काँग्रेस कार्यालयावर हल्ला करण्यात आला. तो हल्ला अमित शाह यांच्या सांगण्यावरून करण्यात आला असे मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात आलेल्या काँग्रेस आंदोलकानी सांगितले.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number