CM Devendra Fadanvis on Sanjay Dina Patil: संजय दीना पाटीलांची धमकी; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी, म्हणाले, ‘यापुढे खपवून घेणार नाही…’

बैठकीदरम्यान शिवसेना (शिंदे गट) नेत्यांकडून करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा उल्लेख करत फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे.

CM Devendra Fadanvis on Sanjay Dina Patil: संजय दीना पाटीलांची धमकी; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी, म्हणाले, ‘यापुढे खपवून घेणार नाही…’

राज्यातील महायुती सरकारच्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. बैठकीदरम्यान शिवसेना (शिंदे गट) नेत्यांकडून करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा उल्लेख करत फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी गेल्या काही दिवसांत शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी आणि नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांचा पाढा वाचून दाखवत थेट शिंदे यांना जाब विचारला. महायुतीच्या शिस्तीला बाधा आणणारी वक्तव्ये यापुढे खपवून घेतली जाणार नाहीत, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

या बैठकीत खासदार संजय दिना पाटील यांच्या विधानांचाही संदर्भ देण्यात आला. ते आता महायुतीचे खासदार असल्याने सर्व घटक पक्षांनी संयम राखणे आवश्यक आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच कोणत्याही आमदार, खासदार किंवा मंत्र्याकडून महायुतीविरोधी किंवा वाद निर्माण करणारी वक्तव्ये भविष्यात सहन केली जाणार नाहीत, असेही मुख्यमंत्र्यांनी ठामपणे नमूद केले.

महायुतीतील एकता टिकवण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व पक्षश्रेष्ठींनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पक्षातील संबंधित नेत्यांबाबत काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number