ठाकरे सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यावर मुख्यमंत्री अयोध्येला जाणार, अंस ट्विट संजय राऊत यांनी केलं होतं.
यानंतर आता अखेरीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अयोध्या दौऱ्याची तारीख ठरली आहे.
संजय राऊत यांनी ट्विट करुन अयोध्याला जाणार असल्याची माहिती दिली आहे.
उद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्येला जाणार आहेत. अशी माहिती संजय राऊत यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
उद्धव ठाकरे अनेक शिवसैनिकांसह अयोध्येला जाणार आहेत.
या ७ मार्चला दुपारी श्रीराम दर्शन, त्यानंतर संध्याकाळी शरयू आरती करणार असल्याचं ट्विटमध्ये सांगितलं आहे.
या ऐतिहासिक सोहळ्यात सामील होण्याचं आवाहन संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमधून केलं आहे.
दरम्यान विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर या आयोजित अयोध्या दौऱ्यावरुन टीका केली होती.
नवी मुंबईत झालेल्या भाजपच्या अधिवेशनादरम्यान देवेंद्र फडणवीस टीका केली होती.
आता अनेक जणं अयोध्येला जायला निघाले आहेत. त्यांनी जरुर जावं. ज्या अयोध्येकरता आम्ही बलिदान केलंय.त्या तिथे जाऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं, तर तुमचं खरं रक्त उफाळून येईल. आणि हिंदुत्वाला विरोध करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही. तुम्हाला प्रभू श्रीराम योग्य मार्गदर्शन करतील.