Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तिसऱ्यांदा ‘डॉक्टरेट’; महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून विशेष सन्मान

राहुरी येथील एका विशेष कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते ही पदवी मुख्यमंत्र्यांना बहाल करण्यात आली. कृषी विकास आणि जलसंधारण क्षेत्रातील त्यांच्या कामाची दखल घेत हा गौरव करण्यात आला.

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तिसऱ्यांदा ‘डॉक्टरेट’; महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून विशेष सन्मान

Devendra Fadnavis:  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपेचात मानाचा तिसरा तुरा रोवला गेला आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून त्यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (D.Sc.) ही मानद पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. राहुरी येथील एका विशेष कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते ही पदवी मुख्यमंत्र्यांना बहाल करण्यात आली. कृषी विकास आणि जलसंधारण क्षेत्रातील त्यांच्या कामाची दखल घेत हा गौरव करण्यात आला असून, यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नावामागे आता ‘डॉक्टर’ ही पदवी अधिकृतपणे जोडली गेली आहे.

जपानमधील विद्यापीठांकडून यापूर्वीचा गौरव
देवेंद्र फडणवीस यांना आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन नामांकित विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट देऊन गौरविले आहे. जपानमधील कोयासन विद्यापीठाने 26 डिसेंबर 2023 रोजी त्यांना पायाभूत सुविधांचा विकास आणि ‘जलयुक्त शिवार’ योजनेद्वारे केलेल्या जलसंधारणाच्या कार्यासाठी डॉक्टरेट दिली होती. विशेष म्हणजे, या विद्यापीठाच्या 120 वर्षांच्या इतिहासात ही पदवी मिळवणारे ते पहिलेच भारतीय ठरले. त्यापूर्वी, 2015 मध्ये ओसाका सिटी युनिव्हर्सिटीने त्यांच्या सामाजिक-आर्थिक धोरणात्मक निर्णयांचे कौतुक करत त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली होती.

जलयुक्त शिवार आणि पायाभूत सुविधांचा पाया
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात राबवण्यात आलेली ‘जलयुक्त शिवार’ ही योजना त्यांच्या डॉक्टरेट मिळवण्यामागील प्रमुख कारणांपैकी एक ठरली आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी त्यांनी केलेल्या जलसंधारण कामांची दखल केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावरही घेतली गेली. औद्योगिक प्रगती आणि पायाभूत सुविधांच्या जाळ्यामुळे महाराष्ट्राचा सामाजिक-आर्थिक स्तर उंचावण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकाराचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने आपल्या मानपत्रात विशेष कौतुक केले आहे.

हेही वाचा – Rohit Pawar: ‘कधी कधी वास्तव कल्पनेपेक्षाही भयंकर असतं..’; बारामती पोटनिवडणूक जाहीर होताच रोहित पवारांची भावूक पोस्ट

देवेंद्र फडणवीस यांचे शिक्षण 
देवेंद्र फडणवीस यांचे प्राथमिक शिक्षण नागपुरातील इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये सुरू झाले होते, परंतु आणीबाणीच्या काळात वडिलांना झालेल्या अटकेनंतर त्यांनी त्या शाळेत जाण्यास नकार दिला आणि पुढील शालेय शिक्षण नागपूरच्याच सरस्वती विद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी धरमपेठ ज्युनियर कॉलेजमधून आपली 12 वी पर्यंतची ओखळ निर्माण केली. उच्च शिक्षणाकडे वळताना त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून 1992 मध्ये 5 वर्षांची विधी पदवी (LLB) प्राप्त केली.

कायद्याच्या अभ्यासानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी जर्मनी गाठले. तिथे त्यांनी बर्लिन येथील DSE (German Foundation for International Development) मधून ‘बिझनेस मॅनेजमेंट’मध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली. यासोबतच त्यांनी जर्मनीतून ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट’ (Methods and Techniques of Project Management) मध्ये विशेष पदविका (Diploma) देखील मिळवली आहे. एकूणच, ते कायद्याचे पदवीधर असण्यासोबतच व्यवस्थापन क्षेत्रातील उच्च विद्याविभूषित तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number