गेल्या तीन वर्षांपासून सततची नापिकी त्यामुळं शेतकरी (Farmers) हैराण झाला आहे. मागील सरकारने कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं तर कर्जमाफी झाली नाही. आता महाविकास आघाडीचे सरकार आलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान भरपाई हेक्टरी 25 हजार देणार म्हणून सांगितलं. मात्र अजूनही नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळं वाशिम जिल्ह्यातील कोळगाव येथील विजय शेंडगे या शेतकरी पुत्राने आपल्या शेतात फलक लावून चक्क आपले कुटुंब विक्रीला काढले आहे. ‘माझा परिवार विकत घ्या, मात्र माझी शेती जगवा’ अशी आर्त याचना फलक लावून सरकारला केली आहे.
मालेगाव तालुक्यातील कोळगाव येथील हे आहेत शेतकरी पुत्र विजय शेंडगे यांच्या आजोबांच्या नावावर 7 एकर कोरडवाहू शेती आहे.
या शेतीवर चार लाख पन्नास हजार रुपये कर्ज आहे.
मागील तीन वर्षांपासून दुष्काळ आहे.
या परिस्थितीत पीक विमा भरूनही अद्याप मदत मिळाली नसल्याने हताश होऊन शेती जगवण्यासाठी परिवार विक्रीला काढलाय.
अधिवेशनात हे सरकार शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावतील असं वाटत असताना, या सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही.
त्यामुळं शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
म्हणून जगावं कसं या चिंतेत आम्ही परिवार विक्रीला काढला आहे.
सततच्या नापिकीने आलेला कर्जबाजारीपणा त्यामुळे जीवन जगणं असह्य झाल्याने शेतकरी आत्महत्येचा करत आहेत.
त्यातच राज्यात सर्वत्र झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं सर्वस्व वाहून गेल्याने प्रपंचाचा गाडा कसा चालवावा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
त्यामुळं सरकारने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.