राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आज टाळेबंदी वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार १ जूनपर्यंत टाळेबंदी वाढवत असल्याचा अधिकृत आदेश प्रसिद्ध करत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. यावरून भाजपा प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
‘मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे, शरद पवारांना बारमालकांची काळजी, तू तुझ्या कुटुंबाची जबाबदारी घे. वसुली सरकारवर विसंबून राहण्यात अर्थ नाही. वसुली सरकारमध्ये पोलिसात वाझे तर लस द्यायला फरहान अख्तर लाडका आहे, सामान्य माणसा तुच तुझा वाली.” असं केशव उपाध्ये यांनी ट्विट केलं आहे.
तसेच ,’लॉकडाउन पुन्हा वाढला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेच होते, “माझे कुटुंब, माझी जबाबदारी!”… सामान्य माणसा, नोकरदारा, बलुतेदारा, नोकरदारा, कष्टकरी मजुरा, तूच आहेस तुझा रक्षणकर्ता. मायबाप राज्य सरकारने तुला नव्या लाटेत वाऱ्यावर सोडले आहे. तुझा ईएमआय, तुझा घरखर्च, तुझ लाईटबिल तूच पाहा.” असं देखील उपाध्ये म्हणाले आहेत.
लॉकडाऊन पुन्हा वाढला. मुख्यमंत्री @OfficeofUT म्हणालेच होते, "माझे कुटुंब, माझी जबाबदारी!"… सामान्यमाणसा,नोकरदारा, बलुतेदारा, नोकरदारा, कष्टकरी मजुरा, तूचआहेस तुझा रक्षणकर्ता. मायबाप राज्य सरकारने तुला नव्या लाटेत वाऱ्यावर सोडले आहे. तुझा EMI, तुझ घरखर्च, तुझ लाईटबिल तुच पहा..२ — Keshav Upadhye (@keshavupadhye) May 13, 2021