Vinod Tawde : विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची नवी रणनीती; विनोद तावडेंकडे दिली ‘ही’ मोठी जबाबदारी

भाजपने इतर राज्यांमध्येही संघटनात्मक समन्वय साधण्यासाठी अनुभवी नेत्यांवर विश्वास दाखवला आहे. नितीन गडकरी यांनी जाहीर केलेल्या नव्या केंद्रीय टीममध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळत आहेत.

Vinod Tawde : विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची नवी रणनीती; विनोद तावडेंकडे दिली ‘ही’ मोठी जबाबदारी

Vinod Tawde :  पुढील वर्षी पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या संघटनात्मक रचनेत मोठे फेरबदल केले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरात या तीन प्रमुख राज्यांसाठी नवीन निवडणूक प्रभारींच्या नियुक्त्या मंगळवारी जाहीर केल्या. या रणनीतीअंतर्गत महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या निवडणूक प्रभारीपदाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांना सहकार्य करण्यासाठी जगदीश ईश्वरभाई पटेल यांची सह-प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पंजाब आणि गुजरातची कमान नव्या नेत्यांकडे
भाजपने इतर राज्यांमध्येही संघटनात्मक समन्वय साधण्यासाठी अनुभवी नेत्यांवर विश्वास दाखवला आहे. राजस्थानचे नेते सतीश पुनिया यांच्यावर पंजाब राज्याच्या प्रभारीपदाची धुरा सोपवण्यात आली असून, तरुण चुग यांची गुजरातच्या राज्य प्रभारीपदी निवड झाली आहे. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचा प्रभाव वाढवणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय घडवून आणणे आणि स्थानिक पातळीवर संघटना अधिक मजबूत करणे हा या फेरबदलांचा मुख्य उद्देश आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणीत जुन्या चेहऱ्यांचे पुनरागमन अन् नवे बदल
पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांनी जाहीर केलेल्या नव्या केंद्रीय टीममध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळत आहेत. माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती करत त्यांच्याकडे पुन्हा मोठी जबाबदारी सोपवली गेली आहे, तर त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांचेही राष्ट्रीय संघटनेत पुनरागमन झाले आहे. याशिवाय, आयटी सेलच्या प्रमुखपदावरून अमित मालवीय यांच्याऐवजी दीपक म्हस्के यांच्याकडे धुरा देण्यात आली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या (BJYM) अध्यक्षपदी तेजस्वी सूर्या यांच्या जागी आता हेमंत जोशी काम पाहतील.

हेही वाचा – Dr. Narendra Dabholkar Case : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात मुख्य आरोपी अंदुरेला जामीन मंजूर, जन्मठेपेच्या शिक्षेवर कोर्टाचा मोठा निर्णय

विनोद तावडे यांचा राजकीय अनुभव
उत्तर प्रदेशसारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील राज्याची जबाबदारी मिळालेले विनोद तावडे हे पक्षातील अत्यंत अनुभवी संघटक मानले जातात. राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून कार्यरत असताना तावडे यांनी यापूर्वी विविध राज्यांत पक्षाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. केरळ विधानसभा निवडणुकीत त्यांच्याच प्रभारी काळात भाजपने आपले ऐतिहासिक खाते उघडले होते. यानंतर 2022 मध्ये बिहारचे प्रभारी असताना तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये लक्षणीय यश संपादन केले होते. आता उत्तर प्रदेशातील आव्हानात्मक निवडणुकीत तावडे यांच्या संघटनात्मक कौशल्याचा भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number