BJP vs MNS Clash : भाजप आणि मनसे कार्यकर्ते भिडले; मनसे शहराध्यक्षाला माराहाण

भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अचानक झालेल्या तुफान राड्यामुळे शहरात तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले.

BJP vs MNS Clash : भाजप आणि मनसे कार्यकर्ते भिडले; मनसे शहराध्यक्षाला माराहाण

BJP vs MNS Clash : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहर मंगळवारी रात्री घडलेल्या एका राजकीय हिंसाचाराच्या घटनेने हादरून गेले आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अचानक झालेल्या तुफान राड्यामुळे शहरात तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले. एका व्यापारी गाळ्याच्या अथवा पक्ष कार्यालयाचा ताबा घेण्याच्या कारणावरून हा वाद उफाळून आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर थेट हिंसाचारात झाले, ज्यामुळे दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले.

पोलीस ठाण्याच्या परिसरातच तुफान राडा; शहराध्यक्षांची कार फोडली

शहरात सुरू झालेला हा राजकीय वाद एवढ्यावरच थांबला नाही, तर तो पोलीस ठाण्याच्या दारापर्यंत पोहोचला. मनसेचे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांनी आधी भाजप कार्यकर्त्यांना धक्काबुक्की व मारहाण केल्याचा आरोप झाला. यानंतर आक्रमक झालेल्या भाजप समर्थकांनी थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारातच शिर्के यांना घेराव घालत मारहाण केली. या गोंधळात मनसे शहराध्यक्षांच्या वाहनाची मोठी तोडफोड करण्यात आली. पोलीस ठाण्याच्या आवारातच कायदा व सुव्यवस्थेचा फज्जा उडाल्याने उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडाली.

रात्रभर पोलीस ठाण्यात ठिय्या 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांच्यासह पक्षाचे अनेक माजी नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले. आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी भाजप नेत्यांनी रात्रभर पोलीस ठाण्यात ठाण मांडले होते. अखेर पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांच्याविरोधात मारहाण, जबरी चोरी तसेच ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करत त्यांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा – Digital Arrest Scam: 'तुमचं आधार कार्ड दहशतवाद्यांकडे…'; बनावट पोलीस बनून निवृत्त प्राध्यापकांची 1 कोटींची फसवणूक

राजकीय वातावरण तापले; पोलिसांचा बंदोबस्त तैनात

या एकांगी पोलीस कारवाईमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला असून, दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांवर अद्याप कोणतीही अधिकृत कारवाई झालेली नाही. या हिंसक घटनेमुळे अंबरनाथमधील राजकीय वातावरण अत्यंत संवेदनशील बनले आहे. संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी आणि शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस प्रशासनाने मुख्य चौक आणि संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. नागरिक आणि स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये या घटनेमुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number