महाराष्ट्रच्या राजकारणात सध्या पक्षांतराच वारे वाहत असताना विदर्भातील वाशिम जिल्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. वाशिमच माजी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत भाजपमध्ये जाहीर प्रवेश करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळ राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुरेश मापारी हे खासदार संजय देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
हेही वाचा- Eknath Shinde : काही तरी घडतंय! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीकडे रवाना
सुरेश मापारी हे काल रात्री त्यांच्या 200 ते 250 पदाधिकारी, सरपंच,आणि कार्यकर्त्यांसह 29 वाहनांचा ताफा घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यापूर्वीही सुरेश मापारी हे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती, मात्र आता ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सकाळी 9 वाजता भाजप प्रवेश होण्याची शक्यता असून भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पक्षप्रवेश संपन्न होणार आहे.
सुरेश मापारी यांच्या जागी बालाजी वानखेडे यांची उबाठाच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. सुरेश मापारी हे माजी जिल्हा परिषद सदस्य, अर्थ आणि बांधकाम सभापती तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राहीलेले आहेत. सुरेश मापारी यांचं ग्रामीण भागात कार्यकर्त्यांचं मोठं जाळं असल्यानं आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत वाशिम जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.