District Council Elections, ZP Election: मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकांबाबत महत्वाची अपडेट; मतदानाची तारीख कधी?

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. अशातच जिल्हा परिषद निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

District Council Elections, ZP Election: मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकांबाबत महत्वाची अपडेट; मतदानाची तारीख कधी?

 

राज्यात बृहन्मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे वारे वाहत असताना, राजकीय पक्षांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. महानगरपालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. अशातच जिल्हा परिषद निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी बुधवारी 7 तारखेपर्यंत सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा- Keshav Upadhye : 'उद्धव ठाकरेदेखील बिनविरोध आमदार झाले होते'; केशव उपाध्याय यांनी बिनविरोध उमेदवार निवडीवरुन ठाकरेंवर साधला निशाणा

यावेळी निवडणूक आयोगाने प्रशासनाची बुधवारी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. महापालिका निवडणुका संपल्यानंतर लगेचच जिल्हा परिषद निवडणुकांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे. यादरम्यान निवडणूक कार्यक्रमाची घोषणा जानेवारीत देऊन मतदानासाठी काही दिवसांची मुदत मागण्याचा पर्याय सध्या समोर आहे. मात्र सध्या राज्यात सुरु असलेल्या महानगपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर जिल्हा परिषद निवडणुका फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ओलांडली जाण्याचे संकेत दिसू लागले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचारकाल वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच मनुष्यबळाच्या मर्यादा लक्षात घेता निवडणूक कार्यक्रमातील तारखांमध्ये फेरविचार करावा लागेल का, यावर देखील विचार सुरु आहे. 

हेही वाचा- Ladaki Bahin Yojana: तुमची ई-केवायसी झालीय? तरीही थांबू शकतात पैसे; लाडकी बहीण योजनेचा 'हा' नवा नियम तुमची झोप उडवणार

 सध्या सर्वत्र मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजत आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. मुंबईत एकूण 2516 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होईल तसेच 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी होणार आहे. याचपार्श्वभूमिवर सर्वपक्षांनी आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून ते जोरदार तयारीला लागले आहेत. 
 

 

 

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number