अमित शाह आज रायगड दौऱ्यावर; शिवपुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावर अभिवादन करणार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावर अभिवादन सोहळा पार पडणार आहे. या ऐतिहासिक दिवशी देशाचे गृहमंत्री अमित शाह रायगडाच्या दौऱ्यावर असून, ते शिवसमाधीला नमन करणार आहेत.

अमित शाह आज रायगड दौऱ्यावर; शिवपुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावर अभिवादन करणार

रायगड: आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावर अभिवादन सोहळा पार पडणार आहे. या ऐतिहासिक दिवशी देशाचे गृहमंत्री अमित शाह रायगडाच्या दौऱ्यावर असून, ते शिवसमाधीला नमन करणार आहेत.

अमित शाह काल रात्रीच पुण्यात दाखल झाले असून, रिट्झ कार्लटन हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम आहे. आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत ते रायगडावर आगमन करतील. राजदरबारात पार पडणाऱ्या मुख्य कार्यक्रमात त्यांचा विशेष सत्कार होणार असून, त्यानंतर सर्व मान्यवर शिवरायांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी पालखीसोबत निघतील.

रायगड किल्ल्यावर जोरदार तयारी सुरू आहे. सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली असून, ऐतिहासिक वास्तूला साजेशी सजावट केली गेली आहे.
दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांच्या दौर्‍यामुळे शिवभक्तांच्या रायगड भेटीवर कोणताही अडथळा येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घर्गे यांनी सांगितले की, रोपवे पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहणार आहे आणि किल्ल्यावर येणाऱ्या भाविकांना कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही. त्यामुळे हजारो शिवप्रेमींना रायगड दर्शनाचा संपूर्ण आनंद घेता येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number