Akshaye Khanna: ‘धुरंधर’मधील अक्षय खन्नाचा डान्स ओरिजिनल नाही? विनोद खन्नाच्या स्टेप्सची हुबेहुब नक्कल; Video Viral

अक्षय खन्नाच्या ‘धुरंधर’मधील डान्स परफॉर्मन्सने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे

Akshaye Khanna: ‘धुरंधर’मधील अक्षय खन्नाचा डान्स ओरिजिनल नाही? विनोद खन्नाच्या स्टेप्सची हुबेहुब नक्कल; Video Viral

Akshaye Khanna: बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ‘धुरंधर’ हा चित्रपट रणवीर सिंहच्या पुनरागमनासाठी जरी ओळखला जात असला, तरी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं ते अक्षय खन्नाने. गंभीर आणि प्रभावी भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्याने चित्रपटातील एका डान्स सिक्वेन्समुळे सध्या सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घातली आहे.

चित्रपटातील अरबी बीट्सवर आधारित असलेल्या या गाण्यात अक्षय खन्नाची सहजता, त्याची स्क्रीनवरील पकड आणि अभिव्यक्ती यांची मोठ्या प्रमाणात चर्चा होतेय. विशेष म्हणजे, ही डान्स परफॉर्मन्स कोरिओग्राफ केलेली नसून, अक्षयने स्वतःच्या नैसर्गिक स्टाईलमध्ये दिला असल्याचे टीमकडून सांगितले जात आहे.

हेही वाचा: ‘Dhurandhar’ Akshaye Khanna Entry BGM : बॉबी देओलनंतर आता अक्षय खन्नाच्या धुरंदरमधील एन्ट्री बीजीएमनं प्रेक्षकांना लावलं वेडं; औरंगजेबनंतर रेहमान डकैतचीही चर्चा

या क्लिप्स इंस्टाग्राम रील्स आणि ट्विटरवर व्हायरल झाल्यापासून चर्चा एका वेगळ्याच वळणावर गेली आहे. अनेक प्रेक्षकांना या परफॉर्मन्समध्ये दिवंगत अभिनेते आणि अक्षयचे वडील विनोद खन्ना यांची झलक दिसल्याचे जाणवले. विनोद खन्ना यांनी 80 च्या दशकात केलेल्या एका प्रसिद्ध चॅरिटी शोमधील परफॉर्मन्ससोबत अक्षयच्या डान्सची तुलना केली जात आहे.

सोशल मीडिया युजर्स म्हणत आहेत की, हे जरी जाणूनबुजून नसेल, तरी अक्षयच्या बॉडी लँग्वेजमध्ये, हातांच्या हालचालींमध्ये आणि त्याच्या आत्मविश्वासात त्याच्या वडिलांची छाप स्पष्ट जाणवते. त्यांच्या मते, अभिनयात आधीच वडिलांचा वारसा पुढे नेणाऱ्या अक्षयने आता नृत्यातूनही तेच सिद्ध केले आहे.

‘छावा’ नंतर ‘धुरंधर’ ही अक्षयच्या कारकिर्दीतली अजून एक महत्त्वाची भर मानली जात आहे. आपल्या भूमिकांमध्ये वेगळेपणा आणणारा आणि बाहेरच्या वादांपासून दूर राहणारा हा अभिनेता प्रत्येक चित्रपटात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करताना दिसतो. त्यामुळेच त्याचे चाहतेही अधिक वाढत आहेत आणि त्याच्या प्रत्येक नवीन प्रयोगाकडे प्रेक्षक उत्सुकतेने पाहतात.

हेही वाचा: Dhurandhar: धुरंधरमुळे पाकिस्तानात खळबळ! ल्यारी गँगवॉरमुळे एवढा गोंधळ का उडाला?

‘धुरंधर’ हा चित्रपट रिलीजच्या काही दिवसांतच बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळवत आहे. रणवीर सिंहची मोठी स्टार पॉवर असतानाही अक्षय खन्ना त्याच्यापेक्षा उजवा ठरत असल्याच्या प्रतिक्रिया कमेन्ट सेक्शनमध्ये दिसून येत आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी लिहिले आहे की, चित्रपटात खरा “सीन स्टीलर” अक्षयच ठरला आहे.

आता या चर्चेमुळे प्रेक्षकांमध्ये आणखी एक कुतूहल निर्माण झाले आहे. अक्षय खऱ्या आयुष्यातदेखील वडिलांचा डान्स किंवा स्टाईल फॉलो करतो का? या व्हिडिओंची लोकप्रियता पाहता, येणाऱ्या काळात अक्षयच्या अशा आणखी परफॉर्मन्सकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले जाणार हे निश्चित.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number