Delhi Blast Update: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी कारवाई! आरोपी मुझम्मिल गनई, आदिल राथेर आणि इतर 2 जणांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. मुझम्मिल शकील गनई, डॉ. आदिल अहमद राथेर, डॉ. शाहीन सईद आणि मुफ्तो इरफान अहमद वागे यांना पटियाला हाऊस कोर्टाने पुन्हा 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Delhi Blast Update: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी कारवाई! आरोपी मुझम्मिल गनई, आदिल राथेर आणि इतर 2 जणांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

Delhi Blast Update: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या भीषण स्फोटाच्या तपासात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. मुझम्मिल शकील गनई, डॉ. आदिल अहमद राथेर, डॉ. शाहीन सईद आणि मुफ्तो इरफान अहमद वागे यांना पटियाला हाऊस कोर्टाने पुन्हा 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शनिवारी या आरोपींची आधीची कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आणि पुढील चौकशीसाठी त्यांना न्यायालयीन ताब्यात पाठवण्यात आले आहे.

व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूलचा विस्तार

दिल्ली स्फोटाशी थेट संबंध असलेल्या या प्रकरणात जम्मू–काश्मीर पोलिसांनी उघड केलेल्या व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे. एनआयएने सांगितले की एजन्सी आत्मघाती हल्ल्याशी संबंधित विविध धागेदोरे एकत्र करत आहे आणि संबंधित राज्यांच्या पोलिसांशी समन्वय करीत इतर संशयितांचा शोध घेत आहे.

हेही वाचा – Delhi Blast Update: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत मोठी अपडेट! डॉ. शाहीनच्या फ्लॅटमधून 18.5 लाख रुपये, सोन्याची बिस्किटे आणि परकीय चलन जप्त

आरोपी मुझम्मिल गनीची गुप्त ठिकाणे उघड

तपासादरम्यान दिल्ली पोलिसांनी मुझम्मिल गनीने दिल्ली–एनसीआर परिसरात घेतलेल्या नवीन दोन लपण्याच्या जागांची माहिती मिळवली आहे. तपासात समोर आले की गनीने कोरी जमालपूर गावात 3 BHK घर भाड्याने घेतले होते. हे घर जुम्मा खान नावाच्या नागरिकाचे होते. एप्रिल ते जुलैदरम्यान तो इथे राहत होता. त्याने मालकाला फळांचा व्यवसाय करणार असल्याचे सांगत मासिक 8 हजार रुपये दराने भाड्याने घर घेतले होते.  

हेही वाचा – Nanded Crime News: कुटुंब हरलं, प्रेम जिंकलं; नांदेडमध्ये प्रेयसीने केले प्रियकराच्या प्रेतासोबत लग्न

भीषण हल्ल्याची पार्श्वभूमी

दरम्यान, 10 नोव्हेंबरच्या संध्याकाळी लाल किला मेट्रो स्टेशनजवळ एका संथ गतीने चालणाऱ्या हुंडई आय20 गाडीत अचानक स्फोट झाला. यात 15 जणांचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. तसेच आसपासच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. प्राथमिक तपासात हे स्पष्ट झाले की या स्फोटात सामील टोळीचे जाळे फरीदाबादमध्ये उघड झालेल्या दहशतवादी मॉड्यूलशी जोडलेले आहे. तपास संस्था संपूर्ण नेटवर्क उध्वस्त करण्यासाठी देशभरात तपासाची व्याप्ती वाढवत आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number