Abhijeet Dipke: स्वातंत्र्यदिनीच अभिजीत दीपकेंना मोठा धक्का! CJPचे इन्स्टाग्राम हँडल झाले ब्लॉक; ‘X’ वरून व्यक्त केला तीव्र संताप

सीजेपीचे अधिकृत इन्स्टाग्राम हँडल अचानक ब्लॉक करण्यात आले. यानंतर अभिजित दिपके यांनी संताप व्यक्त केला आहे.

Abhijeet Dipke: स्वातंत्र्यदिनीच अभिजीत दीपकेंना मोठा धक्का! CJPचे इन्स्टाग्राम हँडल झाले ब्लॉक; ‘X’ वरून व्यक्त केला तीव्र संताप

Abhijeet Dipke CJP Instagram blocked 15 August 2026: दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी तीव्र आंदोलन उभारून देशभरात चर्चेत आलेले ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांना 15 ऑगस्ट च्या दिवशी मोठा धक्का बसला. सीजेपीचे अधिकृत इन्स्टाग्राम हँडल अचानक ब्लॉक करण्यात आले असून ते सोशल मीडियावरून गायब झाले आहे. या प्रकारानंतर कमालीचे संतप्त झालेल्या अभिजीत दीपके यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर स्क्रीनशॉट शेअर करत कडाडून विरोध दर्शवला आणि अकाउंट बंद करणाऱ्यांना थेट ‘डरपोक’ संबोधताना Bloody Cowards असे अपशब्द वापरले.

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणारा आंदोलनाचा फोटो ठरला चर्चेचा विषय
अभिजीत दीपके यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी निवडलेले छायाचित्र सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आले आहे. नीट (NEET) पेपर लीक प्रकरणाविरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा फोटो शेअर करत त्यांनी प्रशासनाला लक्ष्य केले. ‘स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा; हा फोटो आपल्याला सतत आठवण करून देतो की आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे,’ असे स्पष्ट आणि परखड भाष्य त्यांनी या फोटोसोबत केले.

हेही वाचा – Abhijit Dipke : CNNच्या प्रसिद्ध ‘Amanpour’ कार्यक्रमात अभिजीत दिपके; शिक्षण, बेरोजगारीपासून सरकारवरील आरोपांवर नेमकं काय म्हणाले?

सीआयजे सूर्यकांत यांच्या वक्तव्याविरुद्धच्या निषेधातून CJP ची निर्मिती
भारताचे मुख्य न्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांच्या एका वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी अभिजीत दीपके यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ची (CJP) स्थापना केली होती. सुरुवातीला केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित असलेली ही चळवळ पाहता पाहता तुफान लोकप्रिय झाली. त्यानंतर अमेरिकेतून भारतात परत आलेल्या दीपके यांनी NEET पेपर लीक आणि शैक्षणिक भ्रष्टाचाराविरोधात जंतरमंतरवर हजारो विद्यार्थ्यांच्या मदतीने भव्य आंदोलन उभारले, ज्याची दखल केंद्र सरकारलाही घ्यावी लागली.

दिल्लीतील आंदोलनानंतर आता गावांमध्ये ‘स्कूल ठीक करो’ मोहीम
दिल्लीतील यशस्वी आंदोलनानंतर सीजेपीने आता आपला मोर्चा ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्थेतील मूलभूत समस्यांकडे वळवला आहे. अभिजीत दीपके यांच्या महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील स्वगावातून ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची अधिकृत सुरुवात केली जात आहे. या अभियानांतर्गत विशेष पथके स्थापन करण्यात आली असून, ती गावागावांत जाऊन सरपंच आणि ग्रामस्थांशी संवाद साधतील; तसेच शाळांची डागडुजी, पिण्याचे पाणी आणि विद्यार्थ्यांसाठी बाके उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.

हेही वाचा – CJI VS CJP : CJI यांच्या पदवीदान समारंभातील मोहिमेच्या कथित आरोपामुळे BCI ने पदवीधरांची नोंदणी रोखली; सौरभ दास यांनी नोंदवला निषेध, व्हिडीओ शेअर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number