चंद्रभागेच्या वाळवंटात उभारले तंबू रुग्णालय

आषाढी वारीसाठी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये टेन्ट हाऊस अर्थात तंबू रुग्णालय उभा करण्यात आले आहेत. या रुग्णालयामध्ये सर्व प्रकारचे प्रथमोपचार करण्यात येत आहेत. याशिवाय लाईफ सपोर्ट सिस्टिम अर्थात ऑक्सीजन यंत्रणादेखील उभी करण्यात आली. त्यामुळे चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकरी भक्तांची गर्दी झाल्यावर आता कुठल्याही प्रकारचे भाविक अत्यावश्य झाले. तर गर्दीतून मार्ग न काढता थेट तंबू रुग्णालयात त्याच्यावर उपचार […]

चंद्रभागेच्या वाळवंटात उभारले तंबू रुग्णालय

आषाढी वारीसाठी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये टेन्ट हाऊस अर्थात तंबू रुग्णालय उभा करण्यात आले आहेत. या रुग्णालयामध्ये सर्व प्रकारचे प्रथमोपचार करण्यात येत आहेत. याशिवाय लाईफ सपोर्ट सिस्टिम अर्थात ऑक्सीजन यंत्रणादेखील उभी करण्यात आली. त्यामुळे चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकरी भक्तांची गर्दी झाल्यावर आता कुठल्याही प्रकारचे भाविक अत्यावश्य झाले. तर गर्दीतून मार्ग न काढता थेट तंबू रुग्णालयात त्याच्यावर उपचार होणार आहेत. याशिवाय या ठिकाणी विशेष उष्माघात कक्ष व महिलांसाठी हिरकणी कक्ष देखील उभा करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे तंबू रुग्णालय ही संकल्पना कुंभमेळ्याच्या धरतीवर पंढरपुरात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून राबवली जात आहे. त्यामुळे निश्चितच आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या संकल्पनेतील तंबू रुग्णालय हे पंढरपूरच्या वारीत प्रथमच होताना दिसत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number