पंढरपुरात वारकरी भक्तांना चांगल्या प्रकारच्या सुविधा दिल्या आहेत. हे पाहून समाधान वाटत आहे. वारकरी संपूर्णपणे खुश आहेत. पंढरपूर देखील खड्डे मुक्त होत आहे. यासाठी आपण निधी दिला होता ते पूर्णत्वाकडे झाले आहे. त्यामुळे येता काळात शेतकरी बळीराजा सामान्य नागरिक सुखी होऊ दे, पाऊस पडू दे इतकच मागणं विठ्ठलाकडे आहे, अशी प्रतिक्रिया माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात माध्यमांशी बोलताना दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपुरात येऊन आषाढी यात्रे पूर्वी वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांचा आढावा घेतला, यावेळी त्यांच्या सोबत मंत्री गिरीश महाजन आमदार समाधान आवताडे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर उपस्थित होते.