AI 80s Photo Trend : ‘Retro म्हणताय? आम्ही तर OG आहोत!’; 80च्या दशकातील फोटोंच्या ट्रेंडमध्ये ‘या’ नेत्यांचीही उडी

सांगली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर सध्या 1980 च्या दशकातील ‘रेट्रो’फोटोंचा नवा व्हिज्युअल ट्रेंड प्रचंड व्हायरल होत आहे. या ट्रेंडमध्ये राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी देखील उडी घेतली आहे. जयंतराव पाटील यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून 80 दशकातील असे फोटो अपलोड केले आहेत. जे यापूर्वी कोणीही पाहिले नाही. त्यासोबतच जयंतराव पाटील यांनी Retro म्हणताय? […]

AI 80s Photo Trend : ‘Retro म्हणताय? आम्ही तर OG आहोत!’; 80च्या दशकातील फोटोंच्या ट्रेंडमध्ये ‘या’ नेत्यांचीही उडी

सांगली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर सध्या 1980 च्या दशकातील ‘रेट्रो’फोटोंचा नवा व्हिज्युअल ट्रेंड प्रचंड व्हायरल होत आहे. या ट्रेंडमध्ये राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी देखील उडी घेतली आहे. जयंतराव पाटील यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून 80 दशकातील असे फोटो अपलोड केले आहेत. जे यापूर्वी कोणीही पाहिले नाही. त्यासोबतच जयंतराव पाटील यांनी Retro म्हणताय? आम्ही तर OG आहोत! असं कॅप्शन देत युवा पिढी सोबत कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. जयंतराव पाटील यांच्या पोस्टमध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी, शरद पवार, अजितदादा, आर आर आबा, दिलीप वळसे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या सोबतचे जुने फोटो पहायला मिळत आहेत.

हेही वाचा : Sujay Vikhe Patil : महायुतीत वादाची ठिणगी; राष्ट्रवादीच्या नेत्यावर भाजपच्या माजी खासदाराने साधला निशाणा; म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी सर्वांची बाजू ऐकून…’

या ट्रेंडची इतर राजकीय नेत्यांनाही भुरळ पडल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक नेतेमंडळींनी या 80 च्या दशकातील आपल्या लूकचा फोटो सोशल मीडिया माध्यमातून शेअर केला आहे. यामध्ये राम शिंदे, रितू तावडे, महेश लांडगे, पियुष गोयल आदी नेत्यांचा समावेश आहे.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number