Bhiwandi Municipal Election 2026: भिवंडीत फुललं कमळ; मुस्लिम उमेदवारासह 5 जण बिनविरोध विजयी

अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी झालेल्या नाट्यमय घडामोडींमुळे भाजपचे तब्बल 5 उमेदवार बिनविरोध विजयी झाले असून, याआधीच्या एका जागेसह भाजपने विजयाचा 'छक्का' मारला आहे.
Bhiwandi Municipal Election 2026: भिवंडीत फुललं कमळ; मुस्लिम उमेदवारासह 5 जण बिनविरोध विजयी

Bhiwandi Municipal Election 2026: भिवंडी-निजामपूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदानापूर्वीच भारतीय जनता पक्षाने (भाजप) विरोधकांना धोबीपछाड दिली आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी झालेल्या नाट्यमय घडामोडींमुळे भाजपचे तब्बल 5 उमेदवार बिनविरोध विजयी झाले असून, याआधीच्या एका जागेसह भाजपने विजयाचा 'छक्का' मारला आहे. या विजयामुळे भिवंडीच्या राजकारणात भाजपचे पारडे जड झाले आहे.  

मुस्लिम उमेदवाराचा बिनविरोध विजय 

या निवडणुकीत भाजपने केवळ राजकीय ताकदच दाखवली नाही, तर सामाजिक समीकरणांतही बाजी मारली आहे. प्रभाग 18 (क) मधून अबूसूद अशफाक अहमद शेख हे भाजपच्या तिकिटावर बिनविरोध निवडून आले आहेत. केरळमधील त्रिशूर पॅटर्नची आठवण करून देणारा हा विजय महाराष्ट्रातील भाजपच्या समावेशक राजकारणाचे नवे उदाहरण मानले जात आहे.

हेही वाचा – Thackeray Brothers Mini Manifesto: 'दहा रुपयांत जेवण, घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये'; जुनियर ठाकरे बंधूंनी प्रसिद्ध केला 'मिनी जाहीरनामा'

बिनविरोध विजयी झालेले उमेदवार 

अर्ज माघारीच्या अखेरच्या क्षणी विरोधकांनी माघार घेतल्याने पुढील उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला: 1. अश्विनी सन्नी फुटाणकर (प्रभाग 18 अ) 2. दीपा दीपक मढवी (प्रभाग 18 ब) 3. अबूसूद अशफाक अहमद शेख (प्रभाग 18 क) 4. परेश (राजू) चौघुले (प्रभाग 16 अ) 5. भारती हनुमान चौधरी (प्रभाग 23 ब) (टीप: यापूर्वी सुमित पाटील यांनी बिनविरोध विजयाचे खाते उघडले होते.)

हेही वाचा – PMC Election 2026 : 'हॅलो उद्धव…'; शिंदेंच्या एका फोननंतर 'त्या' उमेदवाराची माघार, शिंदेंच्या नेत्यानं केलेला भयानक प्रकार

महापौरपदाच्या दिशेने पहिली झेप 

सुमित पाटील यांच्या विजयाने सुरू झालेली ही मालिका आता 6 जागांपर्यंत पोहोचली आहे. या ऐतिहासिक विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी भिवंडीत गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. हा विजय म्हणजे आगामी महापौर भाजपचाच होणार याची नांदी आहे, असा विश्वास स्थानिक नेत्यांनी व्यक्त केला आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version