कोल्हापूरमध्ये पब्जीमुळे तरूणाचं मानसिक संतुलन बिघडलं!

पब्जी या ऑनलाईन मोबाईल गेममुळे सध्या तरूणांच मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या गेममुळे कोल्हापुरात एका तरुणाच मानसिक संतुलन बिघडल्याचं समोर आलं आहे. त्याला रुग्णालयात नेले असता त्या गेमसंदरर्भातच तो बडबड करत होता. कोल्हापूरमधील सीपीआर रुग्णालयात या मुलाला उपचारासाठी आणण्यात आलं होतं. हा सतत काहीना काही पुटपुटत होता. त्याच्या मित्रांजवळ चौकशी केली असता तो पब्जी […]

कोल्हापूरमध्ये पब्जीमुळे तरूणाचं मानसिक संतुलन बिघडलं!

पब्जी या ऑनलाईन मोबाईल गेममुळे सध्या तरूणांच मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या गेममुळे कोल्हापुरात एका तरुणाच मानसिक संतुलन बिघडल्याचं समोर आलं आहे. त्याला रुग्णालयात नेले असता त्या गेमसंदरर्भातच तो बडबड करत होता.

कोल्हापूरमधील सीपीआर रुग्णालयात या मुलाला उपचारासाठी आणण्यात आलं होतं. हा सतत काहीना काही पुटपुटत होता. त्याच्या मित्रांजवळ चौकशी केली असता तो पब्जी संदर्भात बडबडत असल्याचे समोर आले आहे.

सुरूवातील डॉक्टरांना हा तरुण नशेत असल्याने असं वागत असेल असा अंदाज होताय परंतु उपचार करुनही तो सतत काहीतरी बडबडत असल्याने त्यांनी विचापूस केली असता पब्जीचे कारण समोर आले आहे.

गेम खेळत असताना शुक्रवारी रात्री अचानक तो मोठ-मोठयाने ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून घरच्यांनी खोलीकडे धाव घेतली. त्याची अशी अवस्था पाहून त्याच्या घरच्यांनी त्याला लगेच सीपीआर रुग्णालयात दाखल केलं. तो सलग दोन दिवस पब्जी गेम खेळत होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number