स्विझलर्ड जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताची कुशल बँडमिंटनपटू पी व्ही सिंधूने सुवर्णपदक मिळवलं आहे. जागतिक बँडमिंटन स्पेर्धेत भारताला पहिलं विजेतेपद मिळालं आहे. सिंधूची अंतिम सामन्यात जपानच्या ओकुहारावर 21-7, 21-7 असा विजय मिळविला आहे.
जपानच्या नोझोमी ओकुहाराशी सिंधूचा अंतिम सामना झाला. ती जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असणारी खेळाडू आहे. 8-7 अशी आकडेवारी घेत सिंधू आणि ओकुहारा यांनी हा सामना खेळला आहे. स्वित्झर्लंड येथे हा सामना झाला आहे.
सिंधूने ओकुहाराला अवघ्या ३७ मिनिटांत सरळ सेटमध्ये २१-७, २१-७ ने पराभूत केले आहे. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत नवा इतिहास तीने रचला आहे. सिंधूने पुढच्या अवघ्या सहा मिनिटांत ओकुहारावर 7-2 अशी आघाडी घेतली आहे.
सिंधू खेऴत असतानाच सुरुवातीलाचं आक्रमक खेळी केली. सिंधूने नेट प्लेसिंग आणि परतीच्या फटक्यांचा अतिशय उत्तम खेळ खेळत पहिला गेम 16 मिनिटांत काबीज केला आहे. 21-7 असा नावावर केला. सिंधूने पहिल्या गेममध्ये सलग 8 गुणांची कमाई केली.