यशस्वी जैस्वाल चॅम्पियन्स ट्रॉफी पाठोपाठ रणजीमधूनदेखील बाहेर

मुंबई विरुद्ध विदर्भ असेल रणजी करंडकाच्या उपांत्य फेरीचा सामना

यशस्वी जैस्वाल चॅम्पियन्स ट्रॉफी पाठोपाठ रणजीमधूनदेखील बाहेर

मुंबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारताने संघ जाहीर केला होता. या संघात यशस्वी जैसवालचा समावेश केला गेला होता. त्याला इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात पदार्पण करण्याची संधीदेखील दिली गेली होती. 

भारतीय संघाने फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा संघ जाहीर केला. या संघात जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती होती. वेगवान गोलंदाजीतील मोजके पर्याय बघून भारतीय संघ व्यवस्थापनाने आणि भारतीय निवडकर्त्यानी हा निर्णय घेतला की यशस्वी जैसवालच्या जागी हर्षित राणाला संघात स्थान देण्यात यावं. हर्षित राणाने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत उत्तम कामगिरी केली होती. त्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने हर्षितला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात समाविष्ट केलं. हर्षित राणा सोबत वरुण चक्रवर्थीला देखील संघात स्थान दिले गेले आहे. बुमराहच्या अनुपस्थितीत वरुणच्या कामगिरीवर सर्वांचेच लक्ष असेल. 

यशस्वी जैस्वाल संघात स्थान मिळालं नाही. यांनतर जैस्वालला मुंबईच्या रणजी संघात समाविष्ट करण्यात आलं. मात्र गुढघ्याच्या दुखापतीमुळे जैस्वाल रणजी करंडकाच्या उपांत्य फेरीला मुकणार आहे. मुंबईचा उपांत्य फेरीचा सामना विदर्भ संघाविरुद्ध आहे. याचं दोन्ही संघामध्ये गेल्या वर्षीच्या रणजी करंडकाची अंतिम फेरी झाली होती. 
जैस्वाल यापूर्वी मुंबईसाठी या हंगामात एक रणजी सामना खेळाला होता. जम्मू आणि काश्मीर विरुद्ध हा सामना होता. त्या सामन्यात जैस्वाल जास्त प्रभाव टाकू शकला नव्हता. त्याने पहिल्या डावात 4 तर दुसऱ्या डावात 26 धावा केल्या होत्या. या सामन्यात रोहित शर्मादेखील खेळाला होता. मुंबईचा या सामन्यात पराभव झाला होता.

मुंबई संघ:
अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंगक्रिश रघुवंशी, अमोघ भटकल, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, शिवम दुबे, आकाश आनंद (यष्टीरक्षक), हार्दिक तमोरे (यष्टीरक्षक), सुर्यांश शेडगे, शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियान, मोहित वस्थी, सिल्वेस्टर डिसोझा, रॉयस्टन डायस, अथर्व अंकोलेकर, हर्ष तन्ना.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number