Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंच्या हाता-पायाला फ्रॅक्चर?, बँकेतील राड्यानंतर व्हायरल झालेल्या फोटोमागचे रहस्य काय?

एसटी बँकेतील या राड्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांचे काही फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत.

Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंच्या हाता-पायाला फ्रॅक्चर?, बँकेतील राड्यानंतर व्हायरल झालेल्या फोटोमागचे रहस्य काय?

मुंबई: एसटी बँकेच्या संचालक मंडळात बुधवारी मोठा राडा झाला. या बैठकीत वकील गुणरत्न सदावर्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. भ्रष्टाचाराचे आरोप आणि अश्लील वर्तन केल्याचा दावा करत आमच्यावर हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप दोन्ही संघटनांनी एकमेकांवर केला. बँकेतील या राड्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांचे काही फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत.

सदावर्ते यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
गुणरत्न सदावर्ते यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. तसेच जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या फोटोंच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यांच्या हाता-पायाला फ्रॅक्चर झालं असून रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं या फोटोंमधून दिसत आहे.

हेही वाचा: Shivsena vs Sadavarte: एसटी बँकेत बैठकीदरम्यान राडा, सदावर्ते आणि शिंदे गटात तुफान हाणामारी

नेमकं सत्य काय? 
दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांचे सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे फोटो फेक असल्याची माहिती आता समोर आली आहे. वकीत सदावर्ते हे रुग्णालयात नसून मुंबईतील आपल्या घरी आहेत आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला झालेला नाही. सदर फोटो एआयच्या माध्यमातून तयार केले असण्याची शक्यता आहे. एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत झालेल्या राड्यावेळी गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण झाल्याचा दाव्यात तथ्य नसल्याचं स्पष्ट झालं असून लवकरच याबाबत सदावर्ते यांच्याकडून खुलासा केला जाण्याची शक्यता आहे.

एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हाणामारी
एसटी बँकेच्या संचालक मंडळाची बुधवारी सकाळी बैठक सुरु होती. या बैठकीला सदावर्ते यांच्या पॅनलचे सर्व संचालक आणि शिवसेना अडसूळ पॅनलचे संचालकही उपस्थित होते. आमच्या महिला कर्मचाऱ्यांसोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोप सदावर्ते यांच्या संचालकांनी केला. त्यानंतर मारहाण सुरु झाली. यानंतर मोठा राडा झाला. या राड्यानंतर दोन्ही गट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number