Samruddhi Mahamarg : नाशिक-मुंबई आता आणखी जवळ येणार! नव्या मार्गामुळे अंतर 22 किमीने कमी होणार; कसा असेल मार्ग?

नाशिक ते मुंबई असा प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता नाशिककरांना मुंबई गाठणे अजून सोपे होणार आहे. कारण नाशिक आणि समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या नव्या मार्गामुळे मुंबईकडे जाणारे

Samruddhi Mahamarg :  नाशिक-मुंबई आता आणखी जवळ येणार! नव्या मार्गामुळे अंतर 22 किमीने कमी होणार;  कसा असेल मार्ग?

नाशिक – नाशिक ते मुंबई असा प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता नाशिककरांना मुंबई गाठणे अजून सोपे होणार आहे. कारण नाशिक आणि समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या नव्या मार्गामुळे मुंबईकडे जाणारे अंतर आता तब्बल 22 किलोमीटरने कमी होणार आहे. हा नवा मार्ग कसा असेल आणि कुठून कुठे जोडला जाणार, त्याबाबत आलेली सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

समृद्धी महामार्गाला नवा इंटरचेंज
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सिन्नर तालुक्यातील डुबेरे-सोनारी-सोनांबे- शिवडे-पांढुर्ली-विंचूर दळवीमार्गे भगूर हा रस्ता तसेत बोरखिंड येथे समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या नव्या इंटरचेंजच्या कामाला प्रशासनाने अखेर प्रशासकीय मान्यता दिली आहे. या सर्व कामासाठी 343 कोटी 99 लाख रुपयांचा अंदाजित खर्च येण्याचे अपेक्षित आहे.

हेही वाचा-Mumbai Crime : 'सिरियल कॅट किलर' अखेर अटकेत! तब्बल 20 मांजरांचा केला होता निर्घृण खून; आरोपीवर होतं 50 हजाराचं बक्षीस

सध्याच्या स्थितीला नाशिककरांना समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी इगतपूरी किंवा भरवीर खुर्द येथील असलेल्या जोडणीचा वापर करावा लागतो. याच मार्गांमुळे मुंबईच्या दिशेने जाताना अधिकचे अंतर पार करावे लागत आहे. काही ठिकाणी तर ग्रामीण भागातील अरुंद रस्त्यांमुळे अडचणींचा सामना करावा लागतो. बोरखिंड इंटरचेंजमुळे नाशिक ते मुंबईचे अंतर हे सुमारे 22 किलोमीटरने कमी होण्याची शक्यता आहे. या नव्या निर्णयामुळे प्रवासाचा वेळ तर वाचणार आहे शिवाय वाहनधारकांना मोठा दिलासा मिळेल.

नव्या प्रकल्पात मोठी कामे होणार
एवढेच नाही तर सध्या लागणाऱ्या दुहेरी टोलचा भारही कमी होण्याची मोठी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकल्पात रस्त्यांची अनेक कामे करण्यासह आठ पूल आणि सात भुयारी मार्गही बांधण्यात येणार आहेत.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number