‘मुंबईकरांनी कुठल्याही गोष्टीला न घाबरता सहकार पॅनलला यश दिले’ – प्रवीण दरेकर

मुंबई जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीमध्ये २१ पैकी २१ जागांवर प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनलचा विजय झाला आहे. मुंबई बॅंक निवडणुकीचा निकाल हाती आल्यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुंबईकरांनी कुठल्याही गोष्टीला, प्रलोभनाला आणि धमक्यांना न घाबरता सहकार पॅनलला यश दिले असल्याची प्रतिक्रिया प्रवीण दरेकरांनी दिली आहे. प्रवीण दरेकर म्हणाले, मुंबईकरांनी मुंबई सहकारी चळवळीतील […]

‘मुंबईकरांनी कुठल्याही गोष्टीला न घाबरता सहकार पॅनलला यश दिले’ – प्रवीण दरेकर

मुंबई जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीमध्ये २१ पैकी २१ जागांवर प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनलचा विजय झाला आहे. मुंबई बॅंक निवडणुकीचा निकाल हाती आल्यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुंबईकरांनी कुठल्याही गोष्टीला, प्रलोभनाला आणि धमक्यांना न घाबरता सहकार पॅनलला यश दिले असल्याची प्रतिक्रिया प्रवीण दरेकरांनी दिली आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले, मुंबईकरांनी मुंबई सहकारी चळवळीतील कार्यकर्त्यांनी पुन्हा आमच्यावर विश्वास दाखवला आहे. पहिला मुंबई सहकारी बॅंक निवडणुकीमध्ये २१ जागांपैकी १७ जागांवर बिनविरोध निवड करण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित ४ जागांवर निवडणूक झाली. आणि या चारही जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार प्रचंड मताने विजयी झाले. मुंबई बॅंकेच्या माध्यमातून जो कारभार करण्यात आला त्यावर शिक्कामोर्तब झाला असल्याची प्रतिक्रिया प्रवीण दरेकरांनी दिली आहे.

मुंबई बॅंक आणि आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु मुंबई बॅंकेतील सहकाऱ्यांचा आमच्यावर विश्वास आहे. बॅंकेची प्रगती केली. त्यामुळे मुंबईकरांनी सहकार पॅनलला १०० टक्के यश दिले असल्याचेही दरेकरांनी सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number