मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रवाशांसाना मोठा दिलासा देण्यात आलेला आहे. मुंबईतील अनेक गणेश मंडळांना भेटी देणाऱ्या असंख्य भाविकांना रात्री उशिरापर्यंत प्रवास करता यावा आणि गणेशमूर्तीच्या आगमन-विसर्जनासाठी मेट्रोचा पर्याय उपलब्ध व्हावा, त्यासाठी मुंबईतील असलेल्या सहाही मेट्रो मार्गिकांच्या सेवा कालावधी हा वाढवण्यात आला असून ही अतिरिक्त सेवा 14 ते 25 सप्टेंबरदरम्यान लागू राहणार आहे.
रात्री उशिरा घरी परतणाऱ्या भाविकांना मेट्रोचा दिलासा
गणेशोत्सवात मुंबईतील अनेक भागांतील प्रसिद्ध गणेश मंडळांना भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने दररोज भाविक घराबाहेर पडतात. रात्री उशिरापर्यंत मंडळांना भेटी दिल्यानंतर पुन्हा घरी परतताना प्रवाशांची गैरसोय होऊ नये, त्यासाठी मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून होत होती,त्यानुसार संबंधित मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
मेट्रोच्या वेळेत मोठा बदल
मेट्रो 2 अ,2 ब,7 आणि 9 या मार्गिकांवर शेवटची मेट्रो रात्री ही 11 वाजण्याऐवजी आता रात्री 12.30 वाजता सुटणार आहे.दुसरीकडे चार मार्गिकांवरही 10 ते 15 अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येणार आहे, त्यामुळे गणेशोत्सवाच्या दिवसात रात्रीच्या प्रवासासाठी प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
मेट्रो 3 या मार्गिकेवरही सेवा कालावधी वाढवला आहे. सध्या कफ परेड आणि आरे जेव्हीएलआर स्थानकांवरुन रात्री 10.30 वाजता शेवटी मेट्रो सुटते आणि शेवटच्या स्थानकावर साधारण 11.30 वाजेपर्यंत ती पोहोचते. मात्र,14 ते 25 सप्टेंबर दरम्यान या मार्गिकेवर कफ परेड आणि आरे जेव्हीएलआर येथून रात्री 12 वाजता शेवटी मेट्रो सुटेल. त्यामुळेच मेट्रो 3 ची सेवा ही मध्यरात्री 1 वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे.
यादरम्या, मेट्रो 1 मार्गिकेवरही रात्रीच्या सेवेत वाढ करण्यात आलेली आहे. वर्सोवा येथून घातकोपरच्या दिशेने येणारी शेवटची मेट्रो ही 12.50 ला तर घाटकोपरहून वर्सोव्याच्या दिशेने शेवटची मेट्रो ही रात्री 12.40 वाजता सुटणार आहे. घाटकोपरहून सुटणारी शेवटी मेट्रो ही आता वर्सोवा येथे रात्री 1.03 वाजता पोहोचेल