Mumbai Megablock: प्रवाशांसाठी अलर्ट! रविवारी पश्चिम रेल्वेवर 5 तासांचा जम्बो ब्लॉक; हार्बर मार्गावर सेवा विस्कळीत

मुंबई लोकलच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गांवर वीकेंडला मेगाब्लॉक जाहीर झाला आहे.

Mumbai Megablock: प्रवाशांसाठी अलर्ट! रविवारी पश्चिम रेल्वेवर 5 तासांचा जम्बो ब्लॉक; हार्बर मार्गावर सेवा विस्कळीत

वीकेंडला फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर आधी ही बातमी नक्की वाचा. कारण मुंबई सबर्बन रेल्वे वर शनिवार-रविवारी मोठा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम या तिन्ही मार्गांवर दुरुस्ती आणि देखभाल कामांसाठी हा ब्लॉक घेतला जाणार असून, त्यामुळे अनेक लोकल गाड्यांवर परिणाम होणार आहे. काही गाड्या रद्द होतील, तर काहींचे मार्ग बदलले जाणार आहेत. त्यामुळे प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासणे अत्यावश्यक ठरणार आहे.

मुंबईकरांसाठी ‘लाईफलाईन’ मानल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेवर दररोज लाखो प्रवासी अवलंबून असतात. मात्र, पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी वेळोवेळी मेगाब्लॉक घेतला जातो. यावेळी शाळांच्या परीक्षा संपल्यामुळे वीकेंडला फिरायला जाणाऱ्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे या ब्लॉकचा थेट परिणाम प्रवाशांच्या नियोजनावर होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Pune: पुणे विमानतळावर रात्री हवाई दलाचं विमान कोसळलं; रनवे बंद, प्रवाशांचा खोळंबा

मध्य रेल्वेवर रात्रीपासून ब्लॉक

सेंट्रल रेल्वेच्या मार्गावर ठाणे आणि डोंबिवली स्थानकांवरील फलाट विस्ताराच्या कामासाठी शनिवारी मध्यरात्रीपासून विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत चालणार आहे. यामुळे धीम्या मार्गावरील सेवा प्रभावित होणार असून काही लोकल गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील. परिणामी काही स्थानकांवर थांबे वगळले जाणार आहेत.

हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर परिणाम

हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान तसेच ट्रान्स-हार्बर मार्गावर पनवेल ते ठाणे या दरम्यान देखभाल कामांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. विशेषतः सकाळी ते दुपारपर्यंतच्या वेळेत प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. काही पर्यायी सेवा उपलब्ध असल्या तरी गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

पश्चिम रेल्वेवरही ब्लॉक

वेस्टर्न रेल्वेचेवर सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान जलद मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात जलद मार्गावरील सर्व गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे वेळापत्रक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. काही गाड्या रद्द किंवा मर्यादित अंतरापर्यंतच चालवल्या जातील.

हेही वाचा: Meta Layoffs: टेक जगतात खळबळ! Meta मध्ये मोठी कर्मचारी कपात; AI मुळे नोकऱ्यांवर परिणाम

पालघर-उमरोली दरम्यान जंबो ब्लॉक

याशिवाय पालघर आणि उमरोली स्थानकांदरम्यान पूल बांधकामासाठी विशेष जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम होणार असून काही गाड्या रद्द किंवा मार्ग बदलून चालवल्या जातील.

प्रवाशांना सूचना

प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी अधिकृत वेळापत्रक तपासण्याचे आवाहन केले आहे. शक्य असल्यास पर्यायी वाहतूक साधनांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वीकेंडला बाहेर पडण्याचा प्लॅन असेल तर थोडी खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा मेगाब्लॉकमुळे प्रवासात अडथळे येऊ शकतात आणि तुमचा प्लॅन बिघडू शकतो.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number