‘जाणून घ्या’ महिन्याच्या सुरुवातीला देशात झालेले बदल

  राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्यामुळे राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेंमध्ये ग्रहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान राज्यात इंधनाच्या दरांनी शंभरी गाठली आहे. अशातच म्हणजेच १ नोव्हेंबरपासून देशात अनेक मोठे बदल घडत आहेत. त्यामुळे आता महागाईच्या वेढ्यात सामान्यांच्या खिशाला आणखी जास्त कात्री लागणार आहे. […]

‘जाणून घ्या’ महिन्याच्या सुरुवातीला देशात झालेले बदल

  राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्यामुळे राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेंमध्ये ग्रहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान राज्यात इंधनाच्या दरांनी शंभरी गाठली आहे. अशातच म्हणजेच १ नोव्हेंबरपासून देशात अनेक मोठे बदल घडत आहेत. त्यामुळे आता महागाईच्या वेढ्यात सामान्यांच्या खिशाला आणखी जास्त कात्री लागणार आहे.

गॅस बुकींगबाबतचे नवे नियम

  १ नोव्हेंबरपासून ग्राहकांना गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी आता ओटीपी द्यावा लागणार आहे. त्यामुळे यापुढे ओटीपी दिल्यानंतरच ग्राहकाला गॅस सिलेंडर मिळणार आहे. ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरच ओटीपी पाठवण्यात येईल. तसेच गेल्या काही महिन्यांपासून सिलेंडरच्या किंमती वाढत असून व्यावसायिक एलपीजी सिलेंडर आता २६५ रुपयांनी महागला आहे.

बॅंक ग्राहकांसाठी मोठी सूचना

  आता बँक ग्राहकांना बँकेत पैसे जमा करण्यासाठी आणि बँकेतून पैसे काढण्यासाठी शुल्क आकारले जाणार आहे. १ नोव्हेंबरपासून ग्राहकांना कर्जखात्यासाठी दीडश रुपये द्यावे लागणार आहे. तसेच महिन्यातून तीनपेक्षा अधिक वेळा रक्कम भरल्यास ४० रुपये अधिकचे शुल्क आकारले जाणार आहे.

रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

  नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातील भारतीय रेल्वेच्या देशभरातील रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या बदलांमध्ये १३ हजार पॅसेंजर रेल्वेगाड्या आणि ७ हजार मालगाड्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number