रेल्वे अपघातांपासून मिळणार ‘कवच’

भारतीय रेल्वेने ‘कवच’ तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाची शुक्रवारी चाचणी घेण्यात आली. आणि ही चाचणी यशस्वी ठरली आहे. यावेळी घेण्यात आलेल्या चाचणी दरम्यान, १६० किमी प्रती तासाच्या वेगाने दोन रेल्वे एकमेकांच्या दिशेने येत होत्या. या दोन्ही रेल्वे एकमेकांपासून अवघ्या ३८० मीटरवर येऊन थांबल्या. एका रेल्वेच्या इंजिनमद्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव होते. त्यांनी हा व्हिडिओ अधिकृत […]

रेल्वे अपघातांपासून मिळणार ‘कवच’

भारतीय रेल्वेने ‘कवच’ तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाची शुक्रवारी चाचणी घेण्यात आली. आणि ही चाचणी यशस्वी ठरली आहे. यावेळी घेण्यात आलेल्या चाचणी दरम्यान, १६० किमी प्रती तासाच्या वेगाने दोन रेल्वे एकमेकांच्या दिशेने येत होत्या. या दोन्ही रेल्वे एकमेकांपासून अवघ्या ३८० मीटरवर येऊन थांबल्या. एका रेल्वेच्या इंजिनमद्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव होते. त्यांनी हा व्हिडिओ अधिकृत ट्विटरवर सामायिक केला आहे.

भारतीय रेल्वेने विकसित केलेले कवच तंत्रज्ञान रेल्वे अपघातापासून बचाव करणारे आहे. या तंत्रज्ञानामुळे दोन रेल्वे एकमेकांवर कधीच आदळणार नाही. या तंत्रज्ञानामुळे डिजिटल सिस्टिमला रेड सिग्नल किंवा अन्य कोणती नादुरुस्ती किंवा मानवी चूक दिसली तरी रेल्वे जागच्या जागी थांबते. ही यंत्रणा राबविण्यासाठी प्रती किमी ५० लाख रुपयांचा खर्च येणार आहे. तसेच जगभरात यासाठी २ कोटी रुपये खर्च येतो.

रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, हे तंत्रज्ञान हाय फ्रिक्वेन्सी रेडिओ कम्युनिकेशनवर काम करते. तसेच ते एसआयएल ४ सिस्टम इंटिग्रिटी लेव्हल-४शी सुसंगत आहे, जे सुरक्षा तंत्राचा सर्वोच्च स्तर आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number