Elon Musk On India Birth Rate: भारताचा घटता जन्मदर देशासाठी घातक? एलॉन मस्क यांच्या इशाऱ्याने सोशल मीडियावर खळबळ

मस्क यांचे हे ट्विट सध्या भारतीय सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, देशातील लोकसंख्या अभ्यासकांमध्ये यावर नवीन चर्चा सुरू झाली आहे.

Elon Musk On India Birth Rate: भारताचा घटता जन्मदर देशासाठी घातक? एलॉन मस्क यांच्या इशाऱ्याने सोशल मीडियावर खळबळ

Elon Musk On India Birth Rate: ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी भारताच्या लोकसंख्या बदलाबाबत एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक विधान केले आहे. ‘AF Post’ या आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमाच्या हवाल्याने मस्क यांनी भारतातील घटत्या जन्मदरावर तीव्र चिंता व्यक्त केली असून, हा ट्रेंड देशाच्या भविष्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतो असा इशारा दिला आहे. मस्क यांचे हे ट्विट सध्या भारतीय सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, देशातील लोकसंख्या अभ्यासकांमध्ये यावर नवीन चर्चा सुरू झाली आहे. या आकडेवारीनुसार, भारताचा जन्मदर आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.

‘रिप्लेसमेंट लेव्हल’च्या खाली घसरला दर 
मस्क यांच्या दाव्यानुसार, भारताचा जन्मदर स्थिर लोकसंख्येसाठी आवश्यक असणाऱ्या ‘रिप्लेसमेंट लेव्हल’च्या खूपच खाली गेला आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या भारताचा सरासरी जन्मदर काही वर्षांपूर्वी 2.3 टक्के होता, तो आता थेट 1.9 टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, देशाची राजधानी दिल्लीतील जन्मदर अवघा 1.2 टक्के नोंदवला गेला आहे, जो युरोपमधील फिनलंडसारख्या देशापेक्षाही कमी आहे. जन्मदरातील या ऐतिहासिक घसरणीमुळे देशाची एकूण लोकसंख्या रचना, तरुणांचे प्रमाण आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला भविष्यात मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

चीनला मागे टाकणाऱ्या भारतासमोर नवीन संकट
युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA) च्या ‘स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन’ अहवालातील आकडेवारीनुसार, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे लोकसंख्येचा समतोल राखण्यासाठी जेवढ्या मुलांची गरज असते, त्यापेक्षा कमी मुलांना भारतीय महिला जन्म देत आहेत. भारताने 2023 मध्ये चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होण्याचा मान मिळवला होता. सध्या भारताची एकूण लोकसंख्या 1.46 अब्जांहून अधिक आहे. परंतु, अव्वल स्थानी पोहोचल्यापासूनच देशाच्या जन्मदरात सातत्याने मोठी घट नोंदवली जात आहे, ज्याकडे दुर्लक्ष करणे भारताला महागात पडू शकते.

हेही वाचा – LPG Gas Supply: होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी, 38 भारतीय जहाजे अडकली; देशात LPG गॅसचा पुरवठा खंडित होणार का? मोठी अपडेट समोर

आरोग्य क्षेत्रातील प्रगतीनंतरही लिंगभेद आणि बालविवाहाचे आव्हान कायम
भारताने शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात गेल्या काही वर्षांत नेत्रदीपक कामगिरी केली असली, तरी प्रादेशिक आणि सामाजिक असमानतेमुळे जन्मदरावर विपरित परिणाम झाला आहे. आजही देशात माता मृत्यू दर आणि लिंगभेद चिंताजनक पातळीवर आहेत. विशेषतः 24 वर्षांखालील मुलींचे होणारे बालविवाह हे यामागील मोठे कारण मानले जाते. कमी वयात गर्भधारणा आणि प्रसूतीदरम्यान होणाऱ्या गुंतागुंतीमुळे अनेक मुलींना आपला जीव गमवावा लागतो. कठोर कायदे आणि मोठ्या प्रमाणावर जनजागृती करूनही, समाजात मुलगा आणि मुलगी यांमधील भेदभाव पूर्णपणे नष्ट करण्यात यश आलेले नाही.

तरुणांचा देश होणार वृद्ध; आर्थिक विकासाला बसणार मोठा ब्रेक
लोकसंख्या तज्ज्ञांच्या मते, हा वेग जर असाच सुरू राहिला, तर भारताचे ‘तरुणांचा देश’ हे ब्रीद हिरावले जाण्याची भीती आहे. कमी मुले जन्माला आल्यामुळे भविष्यात कार्यक्षम युवा वर्गाची संख्या वेगाने घटेल आणि वयोवृद्ध नागरिकांचे प्रमाण प्रचंड वाढेल. या लोकसंख्याशास्त्रीय बदलामुळे देशाच्या आर्थिक विकासाचा वेग मंदावेल. उत्पादकता कमी झाल्याने आणि वृद्धांच्या संगोपनासाठी मनुष्यबळ उपलब्ध न झाल्याने सामाजिक रचनेचे संतुलन बिघडेल. परिणामी, जागतिक महासत्ता बनण्याच्या शर्यतीत भारत मागे पडण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number