E. Coli Bacteria: रेल्वे स्थानकावरील पाणी पिताय? मुंबईमधील ‘या’ स्थानकांवर पाण्याच्या टाकीत आढळला जीवघेणा ई-कोलाय जिवाणू

मुंबई आणि आसपासच्या प्रमुख रेल्वे स्थानकांवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये 'ई-कोलाय' (E. Coli) नावाचा धोकादायक जिवाणू सापडला आहे.

E. Coli Bacteria: रेल्वे स्थानकावरील पाणी पिताय? मुंबईमधील ‘या’ स्थानकांवर पाण्याच्या टाकीत आढळला जीवघेणा ई-कोलाय जिवाणू

E. Coli Bacteria:  रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांच्या आरोग्याबाबत एक अत्यंत चिंतेची बाब समोर आली आहे. मुंबई आणि आसपासच्या प्रमुख रेल्वे स्थानकांवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये 'ई-कोलाय' (E. Coli) नावाचा धोकादायक जिवाणू सापडला आहे. नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) यांच्या ताज्या अहवालातून ही गंभीर बाब चव्हाट्यावर आली असून, या बातमीने दैनंदिन प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावर घबराट पसरली आहे.

अहवालातील महत्त्वाचे खुलासे

संसदेत नुकत्याच मांडण्यात आलेल्या या अहवालामध्ये देशभरातील एकूण 512 रेल्वे स्थानकांमधील स्वच्छता आणि नागरी सुविधांची कसून पाहणी करण्यात आली होती. यामध्ये जवळपास 412 बिगर-उपनगरीय स्थानकांमधील पाण्याचा दर्जा खालावलेला असल्याचे निष्पन्न झाले. प्रयोगशाळेत तपासलेल्या पाण्याच्या अनेक नमुन्यांमध्ये 'टोटल कोलिफॉर्म' आणि मानवी आरोग्यास अपायकारक असणारे 'ई-कोलाय' हे जिवाणू मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.

बाधित झालेली प्रमुख स्थानके

मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), कल्याण, भिवंडी रोड आणि लोणावळा यांसारख्या गर्दीच्या स्थानकांवर हा दूषित पाण्याचा प्रकार प्रामुख्याने उघडकीस आला आहे. याव्यतिरिक्त दक्षिण रेल्वेतील कोईम्बतूर-पलक्काड, दक्षिण मध्य रेल्वेतील हैदराबाद आणि पूर्व रेल्वेच्या मधुपूर स्थानकांचाही या अहवालात समावेश आहे. या सर्व ठिकाणी पुरवल्या जाणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा – Amravati Crime: चॉकलेटचं आमिष दाखवत घरात नेलं अन् चिमुकलीसोबत नको ते कृत्य…; अमरावतीत धक्कादायक घटना

प्रवाशांचा संताप आणि प्रशासनाकडून अपेक्षा

मुंबई लोकलने दररोज प्रवास करणारे लाखो नोकरदार आणि नागरिक तहान भागवण्यासाठी स्थानकांवरील वॉटर कुलरचा वापर करतात. मात्र, पाण्याच्या स्वच्छतेबाबत असा निष्काळजीपणा समोर आल्याने प्रवाशांमधून अत्यंत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दूषित पाण्यामुळे जुलाब, तीव्र पोटदुखी आणि इतर संसर्गजन्य आजार पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तातडीने या पाण्याच्या टाक्यांची सफाई करावी, जलशुद्धीकरण यंत्रणेची तपासणी करावी आणि प्रवाशांना सुरक्षित व स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number