Lalbaugcha Raja 2026 : बाप्पाच्या दर्शनाची इच्छा अपुर्णच राहिली; लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू; नेमकं घडलं काय?

यंदाही गणेशोत्सवातही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे, लांबच लांब रांगा आणि गर्दीमुळे अनेक भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी तर गर्दी नियंत्रणाचा प्रश्न ही न

Lalbaugcha Raja 2026 : बाप्पाच्या दर्शनाची इच्छा अपुर्णच राहिली; लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू; नेमकं घडलं काय?

मुंबई : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी होणार गर्दी दरवर्षी वाढताना दिसत आहे. देशाच्या अनेक भागांतून लाखो भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी लालबागमध्ये दाखल होत असतात. मात्र, वाढती प्रसिद्धी आणि भाविकांची मोठ्या प्रमाणात संख्या त्यामुळे दर्शनाच्या रांगेतच मोठी गर्दी होत आहे. अनेक भाविकांना तासनतास रांगेतच उभं राहावं लागत.

भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
यंदाही गणेशोत्सवातही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे, लांबच लांब रांगा आणि गर्दीमुळे अनेक भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी तर गर्दी नियंत्रणाचा प्रश्न ही निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा-Mumbai Kala Chowki Ganpati : दुःखद! मुंबईच्या काळाचौकी परिसरात विजेचा शॉक लागून 8 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू; तर 5 जण जखमी

राजाचं दर्शन घेण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं
याच दरम्यान, 17 सप्टेंबर रोजी पुण्याहून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या जयदीप नेमाडे या 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. जयदीप हा अनेक तासांपासून रांगेत उभा होता. याच दरम्यान त्याला अस्वस्थ वाट लागलं. त्यानंतर उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, काही वेळातच हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमुळे नेमाडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तरुणाच्या मृत्यूनंतर दर्शनासाठी होणाऱ्या गर्दीचा आणि भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number