आर्यन खान ड्रग्ज प्रकरण मागील काही दिवसांत चांगलेच गाजले आहे. तसेच या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. याच प्रकरणी आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या २ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
एनसीबी अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्या अहवालानंतर एनसीबीच्या २ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. आशिष रंजन प्रसाद, आणि व्ही. व्ही. सिंह या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन झाले आहे.
एनसीबी अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्याकडे आलेल्या प्राथमिक अहवालात आशिष रंजन प्रसाद आणि व्ही.व्ही सिंह या २ एनसीबी अधिकाऱ्यांची नावे होती. त्यामुळे संबंधित अहवालाच्या आधारावरच एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, अद्याप कोणत्या आरोपांवर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे, हे समोर आलेले नाही.