‘केतकीवर जाणूनबुजून कारवाई’

शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याने केतकी चितळे हिच्यावर गुन्हा दाखल आहे आणि ती सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. एकाच गुन्याखाली तिच्यावर २२ गुन्हे दाखल आहे. समाजमाध्यमातून केल्येल्या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणात तिला अजूनही जमीन मिळालेला नाही. कळंबोली पोलीस ठाण्यात तिच्यावर अंडी, शाही फेक करण्यात आली होती. यावेळी तिला करण्याचाही प्रयत्न केला गेला. पण पोलिसांकडून या […]

‘केतकीवर जाणूनबुजून कारवाई’

शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याने केतकी चितळे हिच्यावर गुन्हा दाखल आहे आणि ती सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. एकाच गुन्याखाली तिच्यावर २२ गुन्हे दाखल आहे. समाजमाध्यमातून केल्येल्या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणात तिला अजूनही जमीन मिळालेला नाही. कळंबोली पोलीस ठाण्यात तिच्यावर अंडी, शाही फेक करण्यात आली होती. यावेळी तिला करण्याचाही प्रयत्न केला गेला. पण पोलिसांकडून या प्रकाराबाबत साधी तक्रारही नोंदवण्यात आली नाही. या सगळ्याप्रकारणी तक्रार घेऊन केतकीचे वकील राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीला गेले होते.

केतकीवर जाणूनबुजून कारवाई केल्याचं केतकीचे वकीलांचे म्हणणे आहे. या प्रकरणी राज्यपाल आणि केंद्र सरकार ने हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच या प्रकरणात सीबीआय चौकशी करण्याची मागणीही केतकीच्या वकिलांनी केली आहे. केतकीहीला एखाद्या गंभीर गुन्यातील आरोपीसारखी वागणूक देत असल्याचं वकिलांचा म्हणणं आहे. २२ ठिकाणी तिच्या विरोधात तिच्यावर गुन्हा दाखल होणे, तिच्यावर हल्ला होणे, हा सगळं नियोजनाचा भाग असल्याचही त्यांचं म्हणणं आहे. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतरही तिचा जमीन अर्ज फेटाळणे आणि तिच्या कोठडीत वाढ करणे हे कायद्याला धरून नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

या प्रकरणात कायदा कोलमडून पाडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तिला कळंबोली पोलीस ठाण्यात झालेली मारहाण केल्यावर साधी तक्राराही नोंदवण्यात येत नसल्याने या प्रकरणी केन्द्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केल्याचे वकील देशपांडे यांनी सांगितलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number