CIDCO Lottery 2026: नवी मुंबईत 25.50 लाखांत 1 BHK; 4,779 घरांसाठी उद्यापासून नोंदणी, कधीपर्यंत करता येणार अर्ज?

विविध महत्त्वाच्या नोड्समध्ये उभारण्यात आलेल्या तब्बल 4,779 सदनिकांसाठी सोडत प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

CIDCO Lottery 2026: नवी मुंबईत 25.50 लाखांत 1 BHK; 4,779 घरांसाठी उद्यापासून नोंदणी, कधीपर्यंत करता येणार अर्ज?

CIDCO Lottery 2026: नवी मुंबईत स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी सिडकोने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. विविध महत्त्वाच्या नोड्समध्ये उभारण्यात आलेल्या तब्बल 4,779 सदनिकांसाठी सोडत प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार असून, 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ऑनलाइन नोंदणीला सुरुवात होणार आहे. इच्छुक अर्जदारांना सिडकोच्या अधिकृत www.cidcohomes.com पोर्टलवर जाऊन अर्ज करता येईल. याच संकेतस्थळावर सदनिकांची माहिती, किंमत आणि अर्ज प्रक्रियेशी संबंधित तपशील उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

तळोज्यात सर्वाधिक सदनिका

या योजनेत तळोजा सेक्टर 39 येथे सर्वाधिक 4,229 घरे उपलब्ध करण्यात आली आहेत. याशिवाय कळंबोली बस डेपो परिसरात 257 आणि खारघर बस डेपो येथे 293 सदनिकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या योजनेतील सर्व घरे 1 BHK प्रकारातील असून प्रत्येक सदनिकेचे क्षेत्रफळ 322 चौरस फूट आहे. त्यामुळे तुलनेने परवडणाऱ्या दरात नवी मुंबई परिसरात घर मिळवण्याची संधी अर्जदारांना मिळणार आहे.

कुठे किती किंमत?

सदनिकांच्या ठिकाणानुसार त्यांच्या किमतीत फरक आहे. तळोजा सेक्टर 39 येथील घराची किंमत 25.50 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. कळंबोली बस डेपो परिसरातील सदनिकेसाठी 37.70 लाख रुपये, तर खारघर बस डेपो येथील घरासाठी 43.50 लाख रुपये किंमत आहे. संबंधित सदनिकेची अचूक किंमत तसेच लागू होणारे इतर शुल्क याची माहिती सिडकोच्या पोर्टलवर उपलब्ध करण्यात आली आहे.

कोणाला करता येणार अर्ज?

या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराच्या नावावर भारतातील कोणत्याही भागात पक्के घर नसावे, अशी प्रमुख अट आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी नागरिकांनी सिडकोने निश्चित केलेल्या पात्रता निकषांची पूर्तता होते की नाही, हे तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा – FDA Action On Parle Agro Wearhouse : पार्ले अ‍ॅग्रोच्या गोदामांवर FDA ची धाड; मुदत संपलेल्या फ्रूटी आणि अ‍ॅपी फिजचा साठा जप्त

मेट्रो, रेल्वे आणि विमानतळामुळे वाढणार आकर्षण

दरम्यान, तळोजा, खारघर आणि कळंबोली हे नवी मुंबईतील वेगाने विकसित होणारे परिसर मानले जातात. या भागांना रस्ते, रेल्वे आणि मेट्रोच्या माध्यमातून चांगली कनेक्टिव्हिटी मिळते. त्याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळीकतेमुळे भविष्यात या परिसरांचे महत्त्व आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे परवडणाऱ्या किमतीतील या घरांसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येण्याची शक्यता आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number