Mumbai Metro 4 Accident : मुलुंड येथील मेट्रो स्लॅब दुर्घटना! फडणवीस सरकारचे चौकशीचे आदेश; तर मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर

मुलुंड मेट्रो 4 चा स्लॅब कोसळ्याच्या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

Mumbai Metro 4 Accident : मुलुंड येथील मेट्रो स्लॅब दुर्घटना! फडणवीस सरकारचे चौकशीचे आदेश; तर मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर

मुंबई : मुलुंड मेट्रो 4 चा स्लॅब कोसळ्याच्या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सीएमओ कार्यालयातून एक्स पोस्ट करत ही माहिती देण्यात आली आहे. या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले की, मुंबईतील मुलुंड भागात मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून इतर काही जखमी झाले आहेत. या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृताच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार देईल आणि जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

हेही वाचा : Mumbai Metro Accident : मुलुंड येथे मेट्रो 4 प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; एकाचा मृत्यू, चार जण जखमी, एक गंभीर

मेट्रो लाईन 4 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाळा- कासारवडवली ही मेट्रो तब्बल 32.32 किमी अंतराची आहे. या मेट्रो मार्गावर एकूण 30 मेट्रो स्टेशन्स असतील. मेट्रो लाईन 4 ईस्टर्न एक्सप्रेस रोड, मध्य रेल्वे, मोनो रेल्वे, मेट्रो लाईन 2 बी (डीएन नगर ते मांडले), मेट्रो लाईन 5 (ठाणे ते कल्याण), मेट्रो लाईन 6 (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी) यांना इंटर कनेक्टिव्हिटी प्रदान करणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number