UPI Payment: खात्यात ‘झिरो बॅलन्स’ पण तरीही Payment Successful! नेमकी पद्धत काय?

UPI Payment हे सगळ्यांच्या इतके अंगवळणी पडलेय की, रोख रक्कम खिशात ठेवायची सवय मोडली. कारण एका क्लीकवर हा व्यवहार पूर्ण होतो. मात्र खात्यात रक्कम नसल्यास हा व्यवहार करता येत नाही. परंतु यावरसुद्धा NPCI ने एक तोडगा काढला आहे. आता खात्यात शून्य बॅलन्स असेल तरी UPI व्यवहार पूर्ण करता येईल. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) […]

UPI Payment: खात्यात ‘झिरो बॅलन्स’ पण तरीही Payment Successful! नेमकी पद्धत काय?

UPI Payment हे सगळ्यांच्या इतके अंगवळणी पडलेय की, रोख रक्कम खिशात ठेवायची सवय मोडली. कारण एका क्लीकवर हा व्यवहार पूर्ण होतो. मात्र खात्यात रक्कम नसल्यास हा व्यवहार करता येत नाही. परंतु यावरसुद्धा NPCI ने एक तोडगा काढला आहे. आता खात्यात शून्य बॅलन्स असेल तरी UPI व्यवहार पूर्ण करता येईल. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) यूपीआयवर ‘प्री-सँक्शन्ड क्रेडिट लाइन’ (Pre-sanctioned Credit Line) देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

एनपीसीआयने 18 सप्टेंबर रोजी परिपत्रक जारी करत फोनपे, गुगल पे आणि पेटीएमसह सर्व सदस्य बँकांना यूपीआय अकाउंट स्ट्रक्चर प्रमाणित करण्याचे निर्देश दिले आहेत. ग्राहकांना अधिक सुलभ आणि सुरक्षित अनुभव मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, ही नवीन सिस्टीम 15 डिसेंबर 2026 पर्यंत लागू करणे बंधनकारक असणार आहे.

RBI FD New Rules: बँक ग्राहकांची फसवणूक थांबणार; FD दरांबाबत RBI चे 3 महत्त्वपूर्ण निर्णय

Pre-sanctioned Credit Line म्हणजे काय?
आतापर्यंत यूपीआय वापरण्यासाठी खात्यात स्वतःचे पैसे असणे बांधकारक होते. नव्या फ्रेमवर्कनुसार, बँक ग्राहकांना आधीच मंजूर झालेली क्रेडिट मर्यादा देईल. उदाहरणार्थ, बँकेने तुम्हाला 50,000 रुपयांची मर्यादा दिली असेल, तर पेमेंट करताना ही रक्कम आधी बचत खात्यात ट्रान्सफर करण्याची गरज भासणार नाही. पेमेंट करताना बँक खात्यासोबतच ‘क्रेडिट लाइन’ निवडण्याचा पर्याय उपलब्ध होईल. त्यानंतर खर्च केलेली रक्कम ठराविक मुदतीत जमा करावी लागेल.
ही सुविधा बँकेकडून मिळणाऱ्या डिजिटल ओव्हरड्राफ्ट किंवा प्री-ॲप्रूव्ड लोनसारखी आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number