कौमार्य चाचणीचा धक्कादायक व्हिडीओ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हाती

  गेल्या अनेक वर्षांपासून कौमार्य चाचणीबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जनजागृती केली आहे. महाराष्ट्र अंदश्रद्धा निर्मूलन समिती कौमार्य चाचणी विरोधात लढत आहे. मात्र कौमार्य चाचणीचा धक्कादायक व्हिडिओ पहिल्यांदाच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हाती लागला आहे. कौमार्य चाचणीचा हा व्हिडीओ कंजारभाट समाजाचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच संबंधित चित्रफीत तीन वर्षांपूर्वीची असल्याचा ‘अंनिस’चा दावा आहे.   या […]

कौमार्य चाचणीचा धक्कादायक व्हिडीओ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हाती

  गेल्या अनेक वर्षांपासून कौमार्य चाचणीबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जनजागृती केली आहे. महाराष्ट्र अंदश्रद्धा निर्मूलन समिती कौमार्य चाचणी विरोधात लढत आहे. मात्र कौमार्य चाचणीचा धक्कादायक व्हिडिओ पहिल्यांदाच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हाती लागला आहे. कौमार्य चाचणीचा हा व्हिडीओ कंजारभाट समाजाचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच संबंधित चित्रफीत तीन वर्षांपूर्वीची असल्याचा ‘अंनिस’चा दावा आहे.

  या चित्रफितीमध्ये एका हॉटेलच्या खोलीत नववधू आणि नववर दिसत आहेत. या हॉटेलच्या रुमवर पांढऱ्या शुभ्र वस्त्रावर रक्ताचा डाग या व्हिडिओमध्ये दिसत आहे. नववधू हे वस्त्र आपल्या हाताने दाखवत आहे. कौमार्य चाचणीचा हा व्हिडीओ कंजारभाट समाजाचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच समाजातल्या अनिष्ट प्रथांचा धक्कादायक व्हिडीओ पहिल्यांदाच जगासमोर आल्यामुळे राज्याच्या पुरोगामित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number