नाशिक : नाशिक शहरातील कृषी नगर परिसरात झालेल्या विचित्र अपघातात सिद्धार्थ गोरे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कृषी नगरमधील जॉगिंग ट्रॅकजवळ ही संपूर्ण घटना घडली. परिसरात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु होते. याच कामासाठी रस्त्यावर आडव्या पद्धतीने पाईप ठेवण्यात आली होती. याच पाईपवर दुचाकी आदळल्याने तरुणाचा अपघात झाला आहे.
क्षणभरात संपलं सगळं
अपघातानंतर सिद्धार्ग गोरेचा मृत्यू झाला. घडलेल्या घटनेनंतर सिद्धार्थच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांनी संबंधित असलेल्या ठेकेदारावर गंभीर आरोप केले आहेत. पाईपलाईनचे काम सुरु असलेल्या या ठिकाणी वाहनचालकांना सावध करण्यासाठी कोणतेही आवश्य असलेले सुरक्षा फलक लावण्यात आले नव्हते, त्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे.
सुरक्षेचा अभाव की ठेकेदाराचा निष्काळजीपणा?
या अपघाताला संबंधित ठेकेदाराचा निष्काळजीपणा तसेच बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे सांगत मृत तरुणीच्या नातेवाईकांना आंदोलन केले आहे. तरुणाचा मृतदेह हा नाशिक महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर नेत नातेवाईकांना आपला संताप व्यक्त केलेला आहे. या अपघाताला संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे.
आरोप केल्यावर महापालिका प्रशासनाने आपली बाजू स्पष्ट केली आहे. या रस्ताचे काम सुरु असताना रस्त्यावर आडव्या ठेवण्यात आलेल्या पाईपवर रेडियम लावण्यात आलेले होते, असा खुलासा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र, अपघातास्थली सुरक्षा व्यवस्था पुरेशी होती की नाही तसेच अपघातासाठी नेमकी कोणचाी जबाबदारी आहे, असे सर्व प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.