Khawadya Dongar Tragedy: ‘माझ्या संसाराची राखरांगोळी केलीस…’; मृत कुणालच्या आईचा जुना व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओंमध्ये त्यांनी पतीच्या नातेवाइकांमुळे आपला संसार उद्ध्वस्त झाल्याचा, सतत कौटुंबिक छळ सोसावा लागल्याचा आणि हक्काची संपत्ती लाटल्याचा थेट आरोप केला आहे.<br/>

Khawadya Dongar Tragedy: ‘माझ्या संसाराची राखरांगोळी केलीस…’; मृत कुणालच्या आईचा जुना व्हिडीओ व्हायरल

Khawadya Dongar Tragedy: छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावरून दरीत उडी घेऊन चांदगुडे कुटुंबाने घडवून आणलेल्या कृतीला आता अत्यंत गंभीर वळण मिळाले आहे. मृत कुणालची आई संगीता चांदगुडे यांचे सोशल मीडियावरील काही जुने व्हिडीओ अचानक समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या व्हिडीओंमध्ये त्यांनी पतीच्या नातेवाइकांमुळे आपला संसार उद्ध्वस्त झाल्याचा, सतत कौटुंबिक छळ सोसावा लागल्याचा आणि हक्काची संपत्ती लाटल्याचा थेट आरोप केला आहे.

'माझ्या संसाराची राखरांगोळी केलीस'; आईचा व्हिडिओत संतप्त आक्रोश

तणावपूर्ण मनस्थितीत रेकॉर्ड केलेल्या या व्हिडिओमध्ये संगीता यांनी नातेवाइकांना थेट इशारा दिल्याचे दिसते. 'माझं आणि माझ्या मुलाचं वाईट करून झालं असेल, तर स्वतःचं वाईट होताना बघण्याची हिंमत ठेवा! माझ्या संसाराची राखरांगोळी करून माझ्या मुलाला त्याच्या वडिलांपासून दूर केलेस,' अशा तीव्र शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. तसेच, पतीने आजारपणाच्या काळात पाठीशी उभ्या राहिलेल्या पत्नीला सोडून, दुरावलेल्या नातेवाइकांना जवळ केल्याबद्दल त्यांनी अत्यंत उद्विग्न सवाल उपस्थित केले आहेत.

प्रॉपर्टीचा वाद अन् 6 वर्षांच्या जुन्या जखमा

संगीता यांनी व्हिडीओत संपत्ती आणि कौटुंबिक वादावर अनेक खुलासे केले आहेत. कधीही भाच्याला जवळ न करणाऱ्या नातेवाइकांनी केवळ पैशाच्या आणि मालमत्तेच्या हाव्यापोटी भावाला (मुरलीधर) स्वतःच्या बाजूला वळवून घेतले, असा आरोप त्यांनी केला. मुलाचा कायदेशीर हक्क हिरावून घेतल्याचा दावा करत त्यांनी नातेवाइकांच्या या कृत्यामुळे कुटुंबात कायमची दरी निर्माण झाल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा – Crime News: चिडून माहेरी गेली, 10 मिनिटांत परतली, घरातले CCTV बंद केले अन्…; पत्नीने कुटुंबाच्या मदतीने रचला पतीच्या हत्येचा थरारक कट

आयफोनच्या चर्चेला पूर्णविराम; पोलीस तपासाची दिशा बदलणार

यापूर्वी या दुर्घटनेमागे केवळ आयफोनचा हट्ट किंवा मोबाईलच्या हप्त्यांवरून झालेला वाद कारणीभूत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, संगीता यांचे हे व्हिडिओ समोर आल्यानंतर या कृतीमागचं मूळ कारण आयफोन नसून कौटुंबिक छळ, संपत्तीचा वाद आणि नातेवाइकांचा हस्तक्षेप असल्याचे स्पष्ट होत आहे. या व्हिडिओंची सत्यता पडताळून एमआयडीसी वाळूज पोलीस आता संबंधित नातेवाइकांची चौकशी करण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number