यवतमाळ जिल्ह्यात एका मृत्युसह 92 नव्याने पॉझेटिव्ह 85 जण कोरोनामुक्त

यवतमाळ, दि. 14 : जिल्ह्यात 24 तासात एका मृत्युसह 92 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृतकामध्ये यवतमाळ शहरातील 78 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 85 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे […]

यवतमाळ जिल्ह्यात एका मृत्युसह 92 नव्याने पॉझेटिव्ह 85 जण कोरोनामुक्त

यवतमाळ, दि. 14 : जिल्ह्यात 24 तासात एका मृत्युसह 92 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृतकामध्ये यवतमाळ शहरातील 78 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 85 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि. 14) एकूण 900 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 92 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 808 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 450 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 13465 झाली आहे. 24 तासात 85 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 12602 आहे. तर जिल्ह्यात एकूण 413 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 131331 नमुने पाठविले असून यापैकी 130890 प्राप्त तर 441 अप्राप्त आहेत. तसेच 117455 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number