धावत्या लोकलमधून महिलेची प्लॅटफॉर्मवर उडी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई रेल्वेत चढताना हातातून निसटलेल्या बॅगसाठी एका महिलेनं स्वत:चा जीव धोक्यात घालत धावत्या लोकलमधून थेट प्लॅटफॉर्मवरच उडी घेतली. कुर्ला रेल्वे स्टेशनवर मंगळवारी सकाळी ही घटना घडली. शिवानी झा असे या महिलेचे नाव असून, ती ठाण्याच्या वागळे इस्टेट येथे राहते. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरून ती पनवेल लोकल पकड़त होती. लोकलमध्ये चढताना हातातून निसटलेल्या […]

धावत्या लोकलमधून महिलेची प्लॅटफॉर्मवर उडी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

रेल्वेत चढताना हातातून निसटलेल्या बॅगसाठी एका महिलेनं स्वत:चा जीव धोक्यात घालत धावत्या लोकलमधून थेट प्लॅटफॉर्मवरच उडी घेतली. कुर्ला रेल्वे स्टेशनवर मंगळवारी सकाळी ही घटना घडली. शिवानी झा असे या महिलेचे नाव असून, ती ठाण्याच्या वागळे इस्टेट येथे राहते. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरून ती पनवेल लोकल पकड़त होती.

लोकलमध्ये चढताना हातातून निसटलेल्या बॅगसाठी या महिलेने धावत्या रेल्वेतून प्लॅटफॉर्मवर उडी घेतली. ती रेल्वेखाली सापडणार तोच त्या ठिकाणी उपस्थित असलेले रेल्वे पोलीस कर्मचारी विकास पाटील यांनी तिला प्लॅटफॉर्मच्या दिशेने खेचल्याने त्या महिलेचे प्राण वाचले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number