विधानभवन हक्कभंग समितीत कोण कोण ?

संजय राऊतांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी हक्कभंग समिती जाहीर झाली आहे. या समितीत १५ जणांचा समावेश आहे. संजय राऊत यांच्या विधिमंडळावरील वादग्रस्त विधानासंदर्भात तपास करणारण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १५ सदस्यांची हक्कभंग समिती स्थापन केली आहे. या हक्कभंग समितीत राहुल कुल, अतुल भातखळकर, योगेश सागर, अमित साटम, नितेश राणे, अभिमन्यू पवार, संजय शिरसाठ, दिलीप मोहिते […]

विधानभवन हक्कभंग समितीत कोण कोण ?

संजय राऊतांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी हक्कभंग समिती जाहीर झाली आहे. या समितीत १५ जणांचा समावेश आहे.

संजय राऊत यांच्या विधिमंडळावरील वादग्रस्त विधानासंदर्भात तपास करणारण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १५ सदस्यांची हक्कभंग समिती स्थापन केली आहे.
या हक्कभंग समितीत राहुल कुल, अतुल भातखळकर, योगेश सागर, अमित साटम, नितेश राणे, अभिमन्यू पवार, संजय शिरसाठ, दिलीप मोहिते पाटील, सदा सरवणकर, माणिकराव कोकाटे, सुनिल भूसारा, नितीन राऊत, सुनिल केदार, विनय कोरे, आशिष जैस्वाल या आमदारांचा समावेश आहे. राहुल कुल या समितीचे अध्यक्ष असणार आहेत.

काय आहे प्रकरण ?

बुधवारी, १ मार्च २०२३ रोजी कोल्हापुरात “हे विधिमंडळ नाही तर चोरमंडळ आहे”, असे विधान उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले होते.त्यामुळे, सर्वच पक्ष संजय राऊतांविरोधात आक्रमक झाले होते. संजय राऊतांविरोधात सत्ताधाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले. तसेच, संजय राऊतांना अटक करा, अशी शिवसेनेकडून मागणीही करण्यात आली. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंगाची मागणी करणारे पत्र दिले. यानंतर, संजय राऊतांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मंजूर झाला. पुढील दोन दिवसांत या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, असे आदेश विधिमंडळ अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. तसेच, हक्कभंग प्रकरणावर ८ मार्चला निर्णय देण्यात येणार आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे. या प्रकरणी पुढे वेगवान घडामोडी होत आता, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १५ सदस्यांची हक्कभंग समिती स्थापन केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number