Rohit Sharma World Record : जे कोणालाच जमलं नाही, ते ‘हिटमॅन’ने करून दाखवलं; रोहित शर्माने मोडला ख्रिस गेलचा ‘हा’ विक्रम

2007 मध्ये पदार्पण केल्यानंतर रोहितची कारकीर्द काहीशी संथ होती, मात्र तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याला सलामीला धाडण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि तिथून रोहितचे नशीब बदलले.

Rohit Sharma World Record : जे कोणालाच जमलं नाही, ते ‘हिटमॅन’ने करून दाखवलं; रोहित शर्माने मोडला ख्रिस गेलचा ‘हा’ विक्रम

Rohit Sharma World Record : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि स्फोटक सलामीवीर रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजी करताना जागतिक क्रिकेटमध्ये एक नवा अध्याय लिहिला आहे. या सामन्यात रोहितने 26 धावांच्या खेळीदरम्यान दोन उत्तुंग षटकार ठोकले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 650 षटकारांचा टप्पा ओलांडणारा तो जगातील एकमेव खेळाडू ठरला आहे. या ऐतिहासिक कामगिरीसह रोहितने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की त्याला क्रिकेट जगतात 'हिटमॅन' का म्हटले जाते.

हेही वाचा – IND Vs NZ Cricket Match: दुखापतीचे ग्रहण संपेना; न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा झटका

ख्रिस गेलचा विक्रम मोडीत 

रोहित शर्माने केवळ 650 षटकारांचा टप्पाच गाठला नाही, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार मारण्याचा ख्रिस गेलचा विक्रमही मोडीत काढला आहे. ख्रिस गेलने सलामीवीर म्हणून 328 षटकार मारले होते, तर रोहितच्या नावावर आता 329 षटकार जमा झाले आहेत. या यादीत सनथ जयसूर्या (263), मार्टिन गुप्टिल (174) आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (167) हे खेळाडू रोहितच्या खूप मागे आहेत.

हेही वाचा – Davinder Singh Garcha : हॉकी जगतावर शोककळा! हातात हॉकी स्टिक अन् अंगावर खाकी वर्दी… देशासाठी दोन आघाड्यांवर लढणारा सुवर्णपदक विजेता हरपला

धोनीचा तो निर्णय आणि रोहितचा पलटवार 

2007 मध्ये पदार्पण केल्यानंतर रोहितची कारकीर्द काहीशी संथ होती, मात्र तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याला सलामीला धाडण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि तिथून रोहितचे नशीब बदलले. आज रोहितच्या नावावर 280 एकदिवसीय सामन्यांमध्ये 11,542 धावा आहेत, ज्यात 33 शतके आणि 61 अर्धशतकांचा समावेश आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तो मोठी धावसंख्या उभारू शकला नसला तरी, त्याने प्रस्थापित केलेले हे दोन विक्रम क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number